आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ईशान्य भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या बैठकीमध्ये यात आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. मोदी यांनी संभाव्य तिसर्या लाटेवर चिंता व्यक्त केली. हिल स्टेशन, मार्केटमध्ये विना मास्क आणि कोरोना नियमांचे पालन न करता गर्दी होणे ठीक नसल्याचे ते म्हणाले. ही बाब आपल्यासाठी चिंतेची असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
काही लोक छाती फुगवून सांगतात की कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी आम्ही आंनद घेऊ इच्छीतो. परंतु, मला त्यांना सांगायचे की, कोरोना काही आपोआप येत नाही. याला रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायले हवे. कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर आपल्याला कोरोना नियमांचे पालन, मास्क, सोशल डिस्टेंसिंगचा पालन करावा लागेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
बैठकीदरम्यान मोदींच्या महत्वाच्या गोष्टी
1. प्रतिबंध आणि उपचार महत्वाचे
मोदी पुढे म्हणाले की, आम्हाला व्हायरसच्या प्रत्येक प्रकारावर बारीक लक्ष ठेवावे लागेल. यासाठी सूक्ष्म पातळीवर जाऊन कठोर पावले उचलावी लागतील. डेल्टा व्हेरिएंट किती धोकादायक आहे यावर तज्ञ लोकांचा अभ्यास सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंध आणि उपचार हे अधिक महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यासाठी मास्क आणि सामाजिक अंतर ठेवा असेही ते म्हणाले.
2. अनुभवाचा वापर करणे गरजेचे
हेमंत बिस्वा सरमा सांगत होते की, त्यांनी आपल्या राज्यात 6 हजारांपेक्षा जास्त मायक्रो-कंटेन्टमेंट झोन तयार केले. यावर जेवढा जोर दिला जाईल तेवढ्या लवकर आपण या परिस्थितीतून बाहेर पडणार आहोत. आपण गेल्या दीड वर्षापासून या महामारीशी लढत आहोत त्यामुळे आपल्या अनुभवाचा वापर करत ही लाट थांबवावी लागेल असेही पंतप्रधान म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.