आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हर्चुअल (ऑनलाइन) बैठक झाली. यावेळी मोदी सर्व मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, आपल्याला आता लसीकरणावर भर द्यावी लागेल. सध्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ही गावातही वाढत गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल.
या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सामील झाले नव्हते. पण, छत्तीसगडकडून गृहमंत्री ताम्रध्वज साहू सामील झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधूनच मोदींवर निशाणा साधला आहे. ममता यांनी केंद्र सरकारवर बंगालला व्हॅक्सीन न देण्याचा आरोप केला आहे. तसेच, बिहारमध्ये व्हॅक्सीन मोफत देणार असे म्हणणाऱ्या भाजपने व्हॅक्सीन दिलीच नाही, असेही त्या म्हणाल्या.
मृत्युदर कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचे नाव-मोदी
बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात 96 टक्क्यांपेक्षा जास्त लोक ठीक झाले आहेत. आपला देश त्या मोजक्या देशांमध्ये सामील आहे, जेथे मृत्युदर कमी आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आले आहेत. पण, आपल्या देशातील काही राज्यांमध्येच कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. देशातील 70 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 150 पटीने वाढत आहे. याला लवकर थांबवले नाही, तर देशावर पुन्हा आधीसारखे संकट येईल.
या मुद्द्यांवर होऊ शकतो निर्णय
सर्वांसाठी लसीकरण
सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त आजारी व्यक्तींना सामील केले. अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, आजच्या बैठकीनंतर देशातील सर्व नागरिकांना लसीकरण मोफत करण्यात येईल.
लसीकरणात कॉर्पोरेट कंपन्यांची भागीदारी
लॉकडाउन संपवल्यानंतर अनेक ठिकाणी कंपन्या आणि ऑफीस सुरू होत आहेत. खासगी कंपन्यातील कर्मचारी पुन्हा ऑफीसमध्ये येत आहेत. पण, पूर्ण कर्मचारी येत नसल्यामुळे कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. अशात, सरकार त्या कंपन्यांना स्वः खर्चावर लसीकरणाची परवानगी देऊ शकते.
जास्त संक्रमित राज्यांना जास्त लस पुरवणे
सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त खराब परिस्थिती आहे. येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी 17 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले होते. यानंतर पंजाब, केरळ आणि कर्नाटकमध्येही दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. अशा प्रभावित राज्यांना जास्त लस पुरवण्याचा निर्णय होऊ शकतो.
यापूर्वी जानेवारीत चर्चा
पंतप्रधान मोदींनी देशात लसीकरण ड्राइव्ह सुरू होण्यापूर्वी जानेवारीमध्येही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या वेळच्या बैठकीमध्ये देशभरात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.