आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Narendra Modi Updates | PM Modi On Union Budget 2022, India GDP And Aatmanirbhar Arthvyavastha

मोदींचे अर्थसंकल्प विश्लेषण:GDP 110 लाख कोटींवरुन 230 लाख कोटींपर्यंत आणला, निर्यातही 4.70 लाख कोटींच्या पार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

पीएम मोदींनी बुधवारी व्हर्चुअली आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले- गेल्या 7 वर्षात आपण घेतलेल्या निर्णयांमुळे देशाने खूप प्रगती केली आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी, 100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीने संपूर्ण जगासाठी आव्हाने आणली आहेत. जग एका कठीण प्रसंगात उभे आहे. कोरोनापूर्वीचे जग जसे होते तसे राहणार नाही. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. जगाला आता भारताला अधिक मजबूत बघायचे आहे. आपण आपला देश पुढे नेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नवीन संधी मिळण्याची ही वेळ आहे. नवीन संकल्पांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. आपण आत्मनिर्भर होणे फार महत्वाचे आहे. आत्मनिर्भरतेच्या पायावर आधुनिक भारताची उभारणी व्हायला हवी.

गेल्या 7 वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे आज भारताची अर्थव्यवस्था सतत विस्तारत आहे. पूर्वी भारताचा जीडीपी 110 लाख कोटी रुपये होता. आज तो 230 लाख कोटींच्या आसपास आहे. भारताची निर्यात 2.85 लाख कोटींवरून 4.70 लाख कोटींपर्यंत वाढली आहे. परकीय चलनाचा साठा 630 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • गरीब, मध्यमवर्गीयांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर या अर्थसंकल्पाचा भर होता. आपले सरकार मूलभूत सुविधांवर भर देत आहे.
 • पाणी हे महिलांच्या जीवनातील सर्वात मोठे आव्हान आहे. आम्ही जल जीवन मिशनवर काम करत आहोत. आपल्या सरकारच्या प्रयत्नांनी देशातील 9 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाचे पाणी पोहोचू लागले आहे. यामध्ये गेल्या 2 वर्षात जल जीवन मिशन अंतर्गत 5 कोटींहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहेत.
 • यंदाच्या अर्थसंकल्पात 4 कोटी ग्रामीण कुटुंबांना पाईपद्वारे पाण्याचे कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 • पूर्वी 40 हजार कोटी रुपये पाण्यावर खर्च होत होते, आता 60 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
 • देशाच्या विविध भागातील नद्या जोडण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक प्रस्ताव आहेत. विशेषत: केन-बेतवा जोडण्याच्या प्रस्तावामुळे बुंदेलखंडचे चित्र बदलणार आहे.
 • तेथील शेतकऱ्यांचे तरुण मुलं हे बाहेर जातात, ही केन बेटवा लिंक योजना शेतकर्‍यांच्या जीवनात बदल घडवून आणेल. या योजनेवर 44 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
 • शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी ही योजना आधुनिक युगाचा एक भाग ठरणार आहे.
 • गरिबांना जनधन खाते मिळाल्यावर त्यांचा स्वाभिमान जागृत झाला. गरीबाला छप्पर मिळाले की बघा त्याचे आयुष्य किती बदलते.
 • सरकार जे घर त्यांना बनवून देते, ते घर या गरीबांना लखपती बनवतात. आम्ही गेल्या 7 वर्षात 3 कोटी लोकांना घरे देऊन लखपती केले.
 • आता देशाच्या रक्षणासाठी सीमावर्ती गावांतील लोकांची शक्ती समजून घेण्याची वेळ आली आहे. विकासाच्या प्रवासात ती गावे मागे पडू देणार नाही.
 • आता सीमावर्ती गावांसाठी एक नवीन विचार आहे. अशा गावांसाठी वीज, पाणी, रस्त्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ही सीमावर्ती गावे पर्यटन स्थळे बनू शकतात.
 • सीमावर्ती गावांमध्ये आपण एनसीसी शिबिरे आयोजित करू जेणेकरून येथील मुले देशाच्या रक्षणात सहभागी होऊ शकतील.
बातम्या आणखी आहेत...