आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Varanasi Schedule LIVE Update; Yogi Adityanath | PM Narendra Modi Today To Inaugurate Various Projects; News And Live Updates

पंतप्रधानांचा काशी दौरा:उत्तर प्रदेश सरकारचे मोदींकडून तोंडभर कौतुक, म्हणाले- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उत्तर प्रदेशाने ज्या प्रकारे हाताळले ते अभूतपूर्व

वाराणसी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील काशी दौऱ्यावर आहेत. मोदींनी येथे जपान आणि भारत देशाच्या मैत्रीचे प्रतिक असलेल्या रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरसह 15 हजार कोटी रुपयांच्या योजनाचे उदघाटन आणि पायाभरणी केली. त्यासोबतच पंतप्रधानांनी काशी येथील जनतेला संबोधित केले. मोदी यांनी 'भारत माता की जय' आणि 'हर हर महादेव' बोलत आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांनी भोजपूरी भाषेमधून कार्यक्रमातील लोकांशी संवाद साधला.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचे कोरोनाकाळातील कामगिरीचे कौतूक केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे हाताळले ते अभूतपुर्व असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर, गंगा नदीची स्वच्छता, साहित्यकार, कलाकार आणि शेतकऱ्यांवर भाष्य केले.

मोदींच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे
1. भोजपुरी भाषेत भाषणची सुरुवात
2. योगी सरकारचे कौतुक
3. गंगेच्या स्वच्छतेवर भर
4. काशी येथील साहित्यकारांचे कौतुक
5. शेतीशी जोडलेल्या योजनांचे फायदे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...