आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाची उपमा दिल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना स्वपक्षीयांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. गुजरातमधील काँग्रेस नेत्या मुमताज पटेल यांनी या प्रकरणी खरगेंना थेट विचार करून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
मुमताज म्हणाल्या - नेत्यांनी बोलण्यापूर्वी सावधपणे शब्दांची निवड करावी. कारण, त्यांच्या शब्दांचा चुकीचा वापर होऊ शकतो. अशा प्रकारची विधाने टाळणेच योग्य असते. मुमताज या सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार राहिलेल्या दिवंगत अहमद पटेल यांच्या कन्या आहेत. 2 वर्षांपूर्वीच अहमद यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
काय म्हणाले होते खरगे?
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी 28 ऑक्टोबर रोजी गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ते अहमदाबादेतील प्रचारसभेत म्हणाले होते - पंतप्रधान मोदींना पाहून मतदान करण्याचे आवाहन करतात. कितीदा तुमचे तोंड पहावे? आम्ही कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत तुमचे तोंड पाहिले. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत तुमचे तोंड पाहिले. प्रत्येक ठिकाणी तुमचेच तोंड पाहिले. तुमचे रावणासारखी 100 तोंडे आहेत का? मला समजत नाही.
मोदींचा खरगेंवर पलटवार
खरगेंच्या या विधानानंतर 2 दिवसांनी म्हणजे 1 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी खरगेंवर पलटवार केला होता. ते अप्रत्यक्षपणे म्हणाले होते - काँग्रेसला राम सेतूचाही द्वेष वाटतो. काँग्रेसमध्ये पंतप्रधानांना शिवीगाळ करण्याची स्पर्धा रंगली आहे. मला शिव्या घालण्यासाठी त्यांनी रामायणातून रावण आला. एका रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे. लोक जेवढी चिखलफेक करतील, तेवढे कमळ उमलेल.
वडिलांचा वारसा चालवत आहेत मुमताज
मुमताज पटेल या आपले वडील अहमद पटेल यांचा वारसा चालवत आहेत. पटेल 2001 पासून सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते. जानेवारी 1986 मध्ये ते गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. 1977 ते 1982 पर्यंत ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते. सप्टेंबर 1983 ते डिसेंबर 1984 पर्यंत ते काँग्रेसचे जॉइंट सेक्रेटरी होते. त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.