आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पुरुलियामध्ये रॅली केली. यादरम्यान भाषणाची सुरुवात मोदींनी बंगाली भाषेत केली. यावेळी ते म्हणाले की, दीदीला बंगालच्या लोकांच्या हितापेक्षा खेळाची चिंता आहे. पण, यावेळेस बंगालची जतना दीदीच्या विरोधात आहे. दहा वर्षे केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा लोक दीदीला देणार.
मोदी पुढे म्हणाले की, दहा वर्षांच्या तुष्टिकरणानंतर, लोकांवर अनेकदा लाठ्या चालवल्यानंतर दीदी बदलेली दिसत आहे. चंडी पाठ करत आहेत, मंदिरात जात आहेत. पण, हे हृदय परिवर्तन नाही, तर पराभवाची भीती आहे. मी दीदींना सांगू इच्छि तो की, हे सर्व कितीही केले, तरी बंगालची जनता तुम्हा पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही.
भगवान रामाच्या नावाने सुरुवात
यावेळी मोदी म्हणाले की, ही धरती भगवान राम आणि माता सीतेच्या वनवासाची साक्ष देणार आहे. येथे अजुध्या पर्वत आहे, सीता कुंड आहे. अजुध्या नावाने ग्राम पंचायतपण आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा माता सीतेला तहाण लागली होती, तेव्हा भगवान रामाने जमिनीवर बाण मारुन पाणी काढले होते. विचार करा की, तेव्हा पुरुलियामधील जमिनीत किती पाणी असेल. पण, आज परिस्थिती पहा. माझ्या शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठीही पाणी नाही. येथील महिलांना लांबून पाणी आणावे लागते.
तृणमूल सरकार फक्त खेळत आहे
मोदी पुढे म्हणाले की, येथे डावे आणि तृणमूलने बाहेरील उद्योगांना येऊ दिले नाही. पाण्याच्या व्यवस्था पहिल्यासारख्या राहिल्या नाही. येथील समस्यांवर लक्ष्य देण्याऐवजी तृणमूल सरकार आपल्याच खेळात मग्न आहे. यांनी पुरुलियाला जलसंकट, पलायन आणि भेदभाव असलेले शासन दिले. यांनी पुरुलियाची ओळख मागास भाग म्हणून केली. या सर्वांचे उत्तर दीदीला द्यावेच लागेल. येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना सत्तेवरुन उतरवुन त्यांची जागा दाखवून देईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.