आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींचे यूट्यूबवर 1 कोटी सब्सक्राइबर झाले आहेत. एवढे सब्सक्राइबर मिळवणारे ते जगातील पहिले नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 ऑक्टोबर 2007 ला यूट्यूब जॉइन केले होते. जगभरातील लीडरमध्ये मोदींनंतर ब्राझीलचे प्रेसिडेंट जायर बोल्सोनारो आहेत. त्यांचे 36 लाख सब्सक्राइबर आहेत.
पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनलविषयी जाणून घेऊया...
गुजरात बजेट 2011 वर पहिला व्हिडिओ केला होता अपलोड
164 कोटींहून अधिक व्ह्यूज
मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra Modi नावाने आहे. वृत्त लिहेपर्यंत त्यावर 164 कोटी 31 लाख 40 हजार 189 व्ह्यूज झाले होते. या चॅनलवरून ते पीएमओ इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि एक्झाम वॉरियर्स मंत्रज या यूट्यूब चॅनेलचा प्रचारही करतात. ते त्यांच्या चॅनलवर सरकारशी संबंधित योजना, थेट कार्यक्रमही दाखवतात.
मोदींनंतर कोणत्या नेत्याचे सर्वात जास्त सब्सक्रायबर
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हे नरेंद्र मोदींनंतर यूट्यूब सब्सक्रायबर असलेले दुसरे सर्वात मोठे नेते आहेत. त्यांचे 36 लाख सब्सक्रायबर आहेत. त्याचबरोबर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 30.7 लाख सब्सक्रायबर आहेत. त्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आणि शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा क्रमांक लागतो.
भारतात मोदींनंतर राहुल गांधींचे अधिक सब्सक्रायबर आहेत
भारतात नरेंद्र मोदींनंतर राहुल गांधींच्या चॅनलच्या यूट्यूब सब्सक्रायबरची संख्या सर्वाधिक आहे. राहुलच्या चॅनलचे 5.25 लाख सब्सक्रायबर आहेत. शशी थरूर 4.39 लाख सब्सक्रायबरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर असदुद्दीन ओवेसी यांचे 3.73 लाख सब्सक्रायबर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.