आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Will Hold A All Party Meeting On December 4 Via Video Conferencing; The First Important Meeting After Discussions With Vaccine Companies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर सर्वपक्षीय बैठक:नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठक घेतील; व्हॅक्सीन कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर पहिलीच महत्वाची बैठक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांनी शनिवारी 3 शहरातील व्हॅक्सीन उत्पादनाचा आढावा घेतला होता

सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. सरकारची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसरी सर्वपक्षीय बैठक आहे. तसेच, मोदींच्या व्हॅक्सीन कंपन्यांच्या दौऱ्यानंतर पहिलीच महत्वाची बैठक आहे.

4 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत मोदींसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालदेखील सामील होऊ शकतात. ही बैठक अशावेळी बोलवण्यात आली आहे, जेव्हा दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनात मर्ज करण्याच्या चर्चा सुरू आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser