आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:मोदींचे निकटवर्तीय ए. के. शर्मा उपमुख्यमंत्री होणार म्हणून होती चर्चा, परंतु दिले भाजप उपाध्यक्षपद

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शर्मा यांना शनिवारी उत्तर प्रदेशात भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नेमण्यात आले

गुजरात केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अरविंदकुमार शर्मा यांना शनिवारी उत्तर प्रदेशात भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नेमण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शर्मा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाईल, अशी चर्चा होती. प्रदेश भाजपमध्ये ते १६वे उपाध्यक्ष असतील. १५ उपाध्यक्ष येथे अगोदरच कार्यरत आहेत.

योगी मंत्रिमंडळात शर्मा यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा एखादे मंत्रालय दिले जाईल, असे मानले जात होते. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचे मानले जाते. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी २००१ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हापासून शर्मा त्यांच्यासोबत आहेत.

व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी चार महिन्यांपूर्वी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत बैठकीचे अध्यक्षपद शर्मा यांच्याकडे असे आणि मंत्री शेजारी बसलेले असत.शनिवारी भाजपने प्रदेश उपाध्यक्षांसह युवा भाजप, महिला मोर्चा, किसान मोर्चा, मागासवर्गीय मोर्चा अशा विविध संघटनांसाठीचे अध्यक्ष नेमले आहेत. त्यात शर्मा यांची निवड महत्त्वाची मानली जाते.

बातम्या आणखी आहेत...