आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Singh Tomar: Agriculture Minister On Dainik Bhaskar News Over Farmer Protest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी मंत्र्यांनी दाखवला दैनिक भास्कर:शेतकरी आंदोलनात उठली दिल्ली दंगलीतील आरोपींना सोडण्याची मागणी, तोमर म्हणाले- या शेतकऱ्यांच्या मागण्या कशा असू शकतात ?

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आंदोलनावरुन आता नवीन वाद सुरू झाला आहे. टिकरी बॉर्डरवर आंदोलनादरम्यान गुरुवारी दिल्ली दंगलींचे आरोपी शरजील इमाम, उमर खालिद यांचे पोस्टर दाखवुन त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली. दैनिक भास्करने याबाबत बातमी छापली होती.

शुक्रवारी दैनिक भास्करच्या याच रिपोर्टरला कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माध्यमांसमोर दाखवले. यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, MSP आणि कायद्यात बदल करणे, या शेतकऱ्यांच्या मागण्या असू शकतात. पण, दिल्ली दंगलीमधील आरोपींच्या सुटकेची मागणी शेतकऱ्यांची कशी असू शकते ?

तोमर पुढे म्हणाले की, मी सकाळी दैनिक भास्कर वृत्तपत्र वाचत होतो, त्यात हा फोटो छापून आला आहे. APMC ही शेतकऱ्यांची मागणी असू शकते, कृषी कायद्यात बदल करण्याची त्यांची मागणी असू शकते. पण, दिल्ली दंगलींच्या आरोपीच्या सुटकेची मागणी शेतकरी कशी करू शकतात ? मी शेतकरी नेत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही अशा लोकांपासून दूर रहा.

आंदोलनात दिसले होते आरोपींचे फोटो

टिकरी बॉर्डर वरुन दैनिक भास्करचे रिपोर्टर तोषी शर्मा यांनी ही बातमी दिली होती. गुरुवारी संपावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या हातात पोस्टर होते. त्यात दिल्ली दंगलीमधील आरोपी शरजील इमाम, उमर खालिदसह इतर आरोपींचे आणि पुण्यातील भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser