आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • NARI Institute Recruitment Of Various Posts I Including Research Assistant I Know Online Application Process

नोकरीची संधी:'नारी' संस्थेत रिसर्च असिस्टंटसह विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती -2022 ​​​​

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्याकडून नोकर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. एकूण सात जागांसाठी ही भरती केली जाणार असून यामध्ये ज्युनियर नर्स, सीनियर रिसर्च फेलो, कम्युनिटी लायझन ऑफिसर, कुपन मॅनेजर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो, रिसर्च असिस्टंट या पदांचा समावेश असणार आहे. त्यामुळे तरूणांना यामध्ये अर्ज करण्याची संधी असून खालील दिलेल्या बेवसाईडला भेट देऊन ते ऑनलाईन अर्ज करू शकतात.​​​​चला तर सविस्तरपणे संशोधन संस्थेतील भरतीची माहीती घेऊया...

 • किती पदांची भरती - 7
 • अर्जाची पद्धत - ऑनलाईन
 • नोकरीचे ठिकाण - पुणे

पदानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • ज्युनियर नर्स : 30 ऑगस्टपर्यंत.
 • कम्युनिटी लायझन ऑफिसर,
 • डाटा एन्ट्री ऑफरेटर : 31 ऑगस्टपर्यंत.
 • ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो,
 • रिसर्च असिस्टंट : 1 सप्टेंबर पर्यंत.
 • सीनिअर रिसर्च फेलो : 4 सप्टेंबरपर्यंत. पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे
 1. ज्युनियर नर्स - उच्च माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण.
 2. सीनियर रिसर्च फेलो - कोणत्याही विषयात पदव्युत्तर शिक्षण.
 3. कम्युनिटी लायझन - उच्च माध्यमिक शिक्षण.
 4. कुपन मॅनेजर - 12 वी पास.
 5. डेटा एन्ट्री ऑपरेटर - 12 वी पास.
 6. ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो - कोणत्याही विषयात पदव्युत्तर.
 7. रिसर्च असिस्टंट - पदवीधर.

जाहीरात : https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

अधिकृत वेबसाईड : https://www.nari-icmr.res.in/

ऑनलाईन अर्ज - https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

बातम्या आणखी आहेत...