आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये स्कॉर्पियोची दुचाकीस्वाराला धडक:अनेक फूट उंच उसळून पडला, रुग्णालयात मृत्यू; कार चालक फरार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा अपघात 9 डिसेंबर रोजी रात्री घडला. 

महाराष्ट्राच्या नाशकात कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा अपघात 9 डिसेंबर रोजी नाशिकच्या जेल रोड भागात घडला. या अपघाताचा व्हिडिओ तिथे तैनात CCTVमध्ये कैद झाला आहे.

ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी व्हिडिओ दिसणाऱ्या स्कॉर्पियोवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

धडकेनंतर स्कॉर्पियो चालक फरार

या अपघातात ठार झालेला श्रीकांत विजय साबळे नामक व्यक्ती डिव्हायडर नसलेल्या जागेवरून रस्ता ओलांडत होती. तेव्हा वेगात येणाऱ्या स्कॉर्पियोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर श्रीकांत उंच उडून काही फूट अंतरावर जावून पडला. तर दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर स्कॉर्पिओ थांबली नाही. ती तशीच सुसाट वेगाने पुढे निघून गेली. आता या भीषण अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

जखमी व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू

अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीकांत साबळे यांच्या मदतीसाठी स्थानिक तातडीने धावले. मात्र तोपर्यंत भरधाव स्कॉर्पिओ चालक फरार झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी साबळे यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. पण दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या पोलिस फरार स्कॉर्पियो चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रायपूरमध्ये टिप्परने विद्यार्थिनीला चिरडले

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये झालेल्या एका अपघाताचेही मन हेलावून टाकणारा व्हिडिओ उजेडात आला आहे. या व्हिडिओत एक विद्यार्थिनी चौकात स्कूटीवर उभी आहे. तेव्हा तिच्या बाजूला उभा असणारा टिप्पर तिला चिरडत पुढे निघून जातो. या व्हिडिओत स्पष्टपणे बेजबाबदार टिप्पर चालकाने स्कूटीवरील विद्यार्थिनीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तेलीबांधी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...