आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुजफ्फरपूरच्या एका सेक्स वर्करची मुलगी नसीमा खातून यांची NHRC अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. मानवाधिकार आयोगाने त्यांना कोर ग्रुपच्या सदस्या म्हणूनही नॉमिनेट केले आहे. त्यांना वंचित समाजासाठी कार्य करणाऱ्या 'परचम' संघटनेच्या सचिव म्हणून नॉमिनेट करण्यात आले आहे.
मुजफ्फरपूरच्या चतुर्भुज भागात वाढलेली नसीमा आता अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करत रेड लाइट एरियात राहणाऱ्या मुलींना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज त्यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
नसीमा खातून म्हणाल्या - आमच्या वंचित समाजाच्या अधिकारांची लढाई आता पुढे जात आहे. समाजातील सर्वच लहानथोरांच्या आशीर्वादामुळे मला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. आयोगाने देश पातळीवर विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या लोकांची एक समिती स्थापन केली आहे. त्यात मला स्थान मिळाले आहे. आता तुमचा आवाज देशाच्या सर्वात मोठ्या न्यायिक फोरमवर मजबुतीने उपस्थित होईल. त्यावर कारवाईही होईल. ही सर्वांची जबाबदारी आहे. आम्हाला यात निश्चितच यश मिळेल.
दिव्य मराठीशी बोलताना नसीमा म्हणाल्या की, बिहारच्या 38 जिल्ह्यांत रेड लाइट एरिया आहेत. कुठे मोठ्या तर कुठे छोट्या प्रमाणात. मी स्वतः रेड लाइट एरियाची मुलगी आहे. येथेच जन्मले व शिकले. मागील 2 दशकांपासून मी रेड लाइट एरियातील नागरिकांना घटनात्मक अधिकार मिळवून देण्याचा व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी काम करत आहे.
यासंबंधी त्या परचम संघटनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी जनजागृती मोहीम आयोजित करुन जनतेला शिक्षण व आपल्या अधिकारांप्रती जागरूक करत आहेत. तसेच मुलांना लिहिण्यासाठी व आपले मत मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी त्या जुगनू नामक हस्तलिखित नियतकालिकही काढतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.