आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिल्लीतील सरकारी शाळा सर्वोत्कृष्ट, शैक्षणिक संस्थांमधील बदलाचे कौतुक; केरळ पिछाडीवर, राजस्थानची प्रगती उत्तम!

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नॅशनल अॅचीव्हमेंट सर्व्हे, राजस्थानसह 9 राज्यांनी 40 हून जास्त गुण केले संपादन

दिल्लीतील सरकारी शाळा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट आहेत. नीती आयोगाने येथील सरकारी शिक्षण संस्थांमध्ये होत असलेल्या बदलाचे कौतुक करताना नॅशनल अॅचीव्हमेंट सर्व्हेत (एनएस) दिल्लीला जास्त गुण दिले. या पाहणीत दिल्लीतील सरकारी शाळांनी ४४.७३ गुण संपादन केले. आयोगाने तयार केलेल्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० नुसार राष्ट्रीय पातळीवर सरासरी निर्देशांक ३५.६६ राहिला. कमाईच्या बाबतीत दिल्लीतील सरकारी शाळांना ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणल्यामुळे जास्त गुण मिळाले आहेत. राज्यांत सर्वाधिक साक्षर केरळ याबाबतीत आसामहून पिछाडीवर पडला आहे. राजस्थानची घोडदौड चांगली आहे. राजस्थानने आंध्रला मागे टाकून तिसरा क्रमांक मिळवला.

उत्पन्नाची शिक्षणव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका

नीती आयोगाच्या अहवालात उत्पन्नाच्या भूमिकेला महत्त्व देण्यात आले आहे. कारण मध्यम तसेच उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. सरकारी मदत मिळत असलेल्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्य सरकारदेखील सहकार्य करू शकतात, असे आयोगाने म्हटले आहे. शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता वाढल्यास सर्वांना त्याचा फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...