आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Army Day | Marathi News | Marathi News | Pm Narendra Modi Wished India Soldier For National Army Day

आज सेना दिवस:"भारतीय लष्कराच्या अमूल्य योगदानाला शब्द न्याय देऊ शकत नाही", असे म्हणत मोदींनी दिल्या सैनिकांना सेना दिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सेना दिवस असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सैनिकांना तसेत माजी सैनिकांसह त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय लष्कराने दाखवलेल्या शौर्य आणि व्यावसायिकतेची कबुली देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांच्या अमूल्य योगदानाला शब्द न्याय देऊ शकत नाहीत. असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, "सेना दिवसाच्या शुभेच्छा, आपल्या सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आजच्या दिवसाच्या विशेष शुभेच्छा. भारतीय लष्कर आपल्या शौर्य आणि व्यावसायिकतेसाठी ओळखले जाते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारतीय लष्कराच्या अमूल्य योगदानाला शब्द न्याय देऊ शकत नाहीत." असे ट्विट मोदींनी करत शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय सेनेचे महत्व आणि देशासाठी सैनिकांचे बलिदान यासाठी दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. 1949 मध्ये आजच्याच दिवशी फील्ड मार्शल कोदंडेरा एम.करियप्पा यांनी भारताचे शेवटचे ब्रिटीश कमांडर इन चीफ जनरल फ्रांसिस बुचर यांच्याकडून भारतीय सेना कमांडर इन चीफ हा पद स्वीकारला होता.

पंतप्रधानांनी ट्विट करत लिहले आहे की, "भारतीय लष्कराचे जवान प्रतिकूल भागात सेवा देतात आणि नैसर्गिक आपत्तींसह मानवतावादी संकटांच्या वेळी सेना नागरिकांना मदत करण्यात आघाडीवर असतात. परदेशातही शांतता मोहिमेत लष्कराच्या अतुलनीय योगदानाचा भारताला अभिमान आहे." असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेला शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...