आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात पहिल्यांदाच असा ट्रेंड...:देशात सलग 3 दिवस अॅक्टिव्ह रुग्णवाढीचा दर शून्याच्या खाली, 5 महिन्यांनी मायनसमध्ये

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅक्टिव्ह रुग्ण सलग 2 आठवड्यांपर्यंत वाढले नाही तर तो कोरोनाचा ‘पीक’ समजला जाईल

देशात आठवडाभरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५० हजारांपर्यंत घटली आहे. एप्रिलनंतर प्रथमच अॅक्टिव्ह रुग्णवाढीचा दर सलग ३ दिवस शून्याच्या खाली राहिला. कारण गेल्या ३ दिवसांत नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात एकूण ९.६० लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १७ सप्टेंबरला हे प्रमाण १० लाख होते. डब्ल्यूएचओनुसार, सलग २ आठवडे अॅक्टिव्ह रुग्णवाढीचा दर शून्य राहिला तर त्याला कोरोनाचा पीक समजले जाते. म्हणजे रोज रुग्णसंख्या किती असेल याचा त्या देशाला अचूक अंदाज येताे.

केंद्र सरकारचा दावा
देशात २.४८ लाख ऑक्सिजन बेड, पैकी ८४.७% सध्या रिकामे आहेत
66,638 आयसीयू बेड
24,399 वर रुग्ण, 63% रिकामे
1 एप्रिलपूर्वी देशभरात 11,500 आयसीयू बेड रिझर्व्ह होते.
- केंद्रीय आरेाग्य मंत्रालयानुसार, देशात कुठेही ऑक्सिजन सपोर्ट असलेल्या बेड्सची टंचाई नाेंदवण्यात आलेली नाही. बहुतांश राज्यांच्या कोविड सेंटरमधील 70% पेक्षा जास्त बेड्स रिकामेच आहेत.

प्रत्यक्षात अशी आहे परिस्थिती
महाराष्ट्र-छत्तीसगडमध्ये ऑक्सिजन बेड नाहीत, दिल्लीत ६२% भरले
- 2.7 लाख अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ऑक्सिजन सुविधांचे 56,356 बेड आहेत. आता एकाही बेड रिकामा नाही. 1 एप्रिलपूर्वी राज्यात 22,692 ऑक्सिजन सपोर्ट बेड होते.
- छत्तीसगडमध्ये एकूण 14 हजार ऑक्सिजन बेड आहेत. राज्यात एकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच दुसऱ्या रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळत आहे. 1 एप्रिलपूर्वी राज्यात से 6 हजार बेड होते.
- दिल्लीत ऑक्सिजन सपोर्टचे 62% बेड्स रुग्णांनी भरले आहेत. येथे कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याचा सरकारचा दावा आहे.

5 महिन्यांनी मायनसमध्ये
- 20 सप्टेंबर 0.59%
- 21 सप्टेंबर 0.28%
- 22 सप्टेंबर -0.07%
- 23 सप्टेंबर -0.25%
- 24 सप्टेंबर -0.19%

ऑक्सिजन बेडचे महत्त्व : फ्रान्समध्ये मृत्युदर 19.6% वरून 6.2% वर आला
फ्रान्स, स्पेनसह अनेक युरोपियन देशांत कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. एप्रिलमध्ये तेथे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना रुग्णालयांत ऑक्सिजन सपोर्ट असलेल्या बेड्सची टंचाई दोन महिन्यांपर्यंत होती. यामुळे फ्रान्समध्ये मे महिन्यात मृत्युदर १९.६% पर्यंत गेला होता. आता नव्या रुग्णांची संख्याही जवळपास मेइतकीच आहे. मात्र मृत्युदर ६.२% पेक्षा जास्त नाही. कारण की फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेनसारख्या युरोपियन देशांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्ट असलेल्या बेड्सची संख्या चार महिन्यंात दहा पटींनी वाढवली आहे.

बातम्या आणखी आहेत...