आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Herald Office Sealed In Delhi: | The Office Of The Young India Company Was Temporarily Sealed | Marathi News

दिल्लीतील नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील:यंग इंडिया कंपनीचे कार्यालय तात्पुरते सील, EDने एक दिवस आधी टाकला होता छापा

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी नॅशनल हेराल्डचे दिल्लीतील कार्यालय सील केले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीच्या पथकाने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या 16 ठिकाणी सकाळपासून उशिरापर्यंत छापे टाकले. सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नॅशनल हेराल्ड कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ईडीच्या कारवाईवर राहुल गांधी म्हणाले होते- काँग्रेस तुमच्या लोकांची आहे आणि तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. हुकूमशहाच्या प्रत्येक हुकुमाशी लढायचे आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली. ईडीने 21 जुलैला 3 तास, 26 जुलैला 6 तास आणि 27 ऑगस्टला 3 तास चौकशी केली. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. ईडीने जूनमध्ये पाच दिवसांत राहुल गांधींची ५० तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती.

EDने सोनियांना हे प्रश्न विचारले होते

  • यंग इंडिया लिमिटेड ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते?
  • तुमच्या निवासस्थानी 10 जनपथवर किती व्यवहार बैठका झाल्या?
  • तुम्हाला व्यवहाराबद्दल काय माहिती आहे? त्याचे शेअर्स कसे विकले?