आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National News Update | Three Killed In Attack On Hindu Temple During Durga Puja In Bangladesh

बांग्लादेशात मंदिरांवर हल्ला:दुर्गा पूजेदरम्यान मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, गोळीबारात तिघांचा मृत्यू

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेश पोलिसांचे म्हणणे आहे की दुर्गा पूजेच्या वेळी जमावाने चांदपूर जिल्ह्यातील हिंदू मंदिरावर हल्ला केला. या चकमकीदरम्यान त्यांनी 3 जणांना गोळ्या झाडून ठार केले. देशाच्या विविध भागांतील मंदिरांवर अशाच प्रकारच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत.

बांगलादेश हिंदू एकता परिषदेने ट्वीट केले, "13 ऑक्टोबर 2021 हा बांगलादेशच्या इतिहासातील निंदनीय दिवस आहे. अष्टमीला मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने अनेक पूजा मंडपांची तोडफोड करण्यात आली आहे. हिंदूंना आता पूजा मंडपांचे रक्षण करावे लागेल. आज संपूर्ण जग शांत आहे. माता दुर्गाने सर्व हिंदूंवर तिचा आशीर्वाद कायम ठेवावा. कधीही त्यांना क्षमा करु नका."

बांगलादेश हिंदू एकता परिषदेने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हिंदूंना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. कौन्सिलने ट्विट केले की जर बांगलादेशच्या मुस्लिमांना नको असेल तर हिंदू पूजा करणार नाहीत. पण किमान हिंदूंना वाचवा. हा हल्ला अजूनही सुरू आहे. कृपया सैन्य पाठवा. आम्हाला पूजा मंडपात बांगलादेशचे सैन्य हवे आहे.

बातम्या आणखी आहेत...