आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Oil Marketing Companies Have Reduced Commercial 19 kg LPG Cylinder Cost By Rs 91.50 Effective From Today

दिलासा:व्यावसायिक LPG सिलेंडर 91.50 रुपयांनी झाले स्वस्त, आजपासून लागू होणार दर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पापूर्वी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 91.50 रुपयांनी कपात केली आहे. किंमत कपात 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहे. दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1907 रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमतीत विक्रमी 8.5% वाढ झाली आहे.

मार्केटिंग कंपन्यांनी विना सब्सिडीच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. देशाची राजधानी नवी दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 899.5 रुपयांवर कायम आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 102.50 रुपयांनी कपात केली होती, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या दरात कपात होणे अपेक्षित आहे. याआधी कंपन्यांनी 1 डिसेंबरला कमर्शियल गॅस सिलिंडर महाग केले होते.

बातम्या आणखी आहेत...