आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Party Status To 'AAP', NCP To Contest 750 Seats In 4 States, National Party Status Of CPI And Trinamool Canceled

‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा:4 राज्यांत 750 जागा लढवणार; राष्ट्रवादी, भाकप अन् तृणमूलचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा झाला रद्द

मुकेश कौशिक | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राजकीय पटलावर आम आदमी पक्ष (आप) मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकनंतर राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सोमवारी ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. तर ममतांचा तृणमूल, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (सीपीआय) हा दर्जा काढून घेतला. आपने चारही राज्यांतील सुमारे ७५० विधानसभेच्या जागांसह लोकसभेच्या ५० पेक्षा अधिक जागांवर स्वत:साठी रोडमॅप तयार केला आहे. कर्नाटकातील सर्व २२४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या आपला राजस्थानकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत.

काँग्रेसमध्ये सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील, तसेच भाजपमध्ये वसुंधराराजे व उर्वरित पक्षांतील राजकीय डावपेचांचा फायदा घेण्याची संधीही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासमोर आहे. यासाठी आप राजस्थानात आपल्या कार्यकर्त्यांचे सोशल नेटवर्क तयार करत आहे. याद्वारे पक्ष इतर पक्षांतील नाराज कार्यकर्ते व नेत्यांना सोबत घेण्याच्या दुहेरी धोरणावर काम करत आहे.

दिव्य मराठी एक्सप्लेनर
राष्ट्रवादीवर कारवाई कशामुळे

१. लोकसभेला चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये किमान २ टक्के मते हवीत. { राष्ट्रवादीला २०१९ च्या लोकसभेत फक्त ०.९३ टक्के मतदान.
२. लोकसभा निवडणुकीत किमान तीन राज्यांतून चार खासदार विजयी होणे आवश्यक. { २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातच ४ खासदार होते. २०१९ मध्ये ५ झाले. पण फक्त महाराष्ट्र व लक्षद्वीप या दाेनच राज्यांतून ते निवडून आले हाेते.
३. किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा हवा. { विधानसभेला किमान सहा टक्के मते व दोन आमदार निवडून आले तरच प्रादेशिक पक्षांचा दर्जा मिळतो. महाराष्ट्र विधानसभेत १६ टक्के मते व ५४ जागा जिंकल्या. नागालँडमध्येही ७ टक्के मते व सात आमदार. पण या दोनच राज्यांत राष्ट्रवादीला प्रादेशिक दर्जा. इतर राज्यांत अपयश. गोव्यात २ टक्के, मणिपूरमध्ये ०.९५ टक्के, मेघालयात १.६१ टक्केच मते.

सचिन पायलट यांचे आज उपाेषण
राजस्थानात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट मंगळवारी आपल्याच सरकारविराेधात उपाेषण करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या पुढच्या हालचालींवर आपचा डोळा आहे. आपचे म्हणणे आहे की, सध्या पायलट काँग्रेसमध्ये राहून गहलोत यांच्या गटाला धक्का देऊ शकतात. गहलोत सरकार अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा सामना करत आहे. गुर्जर मतदारांशिवाय तरुणांचा कल सचिन यांच्या बाजूने आहे. {पायलट यांच्याकडे काँग्रेस सोडणे व स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा पर्याय आहे. अशा वेळी आप त्यांना आकर्षित करण्याची शक्यता आहे.