आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशांतर्गत उड्डाणांवर मोठा निर्णय:सरकारने निर्बंध हटवले, 18 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना संसर्गाची घटती प्रकरणे पाहता प्रवासी विमानांना पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 ऑक्टोबरपासून 100% क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना परवानगी दिली आहे.

नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की देशात आता देशांतर्गत उड्डाणे निर्बंधाविना उड्डाणे करु शकतील. प्रवाशांच्या मागणीनुसार हे करण्यात आले आहे. नवीन आदेश सोमवार 18 ऑक्टोबरपासून लागू होईल. दरम्यान, सरकारने सर्व विमान कंपन्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.