आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी तासभर चर्चा केली. या चर्चेत नेमके कुठले मुद्दे होते यावर राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा उठल्या आहेत. चर्चेतील मुद्द्यांवर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, पवारांनी मोदींची भेट घेण्यापूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.
तर दुसरीकडे, शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान, नवगठित सहकार विभाग, महाराष्ट्रसह देशातील कोरोनाची गती, बॅकिंग सुधारणांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे एनसीपीने सांगितले होते.
काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरण्यापूर्वी हा मुद्दा मोदी यांच्या समोर ठेवला जावा. जेणेकरुन केंद्र सरकार याबाबत काही कठोर निर्णय घेणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्द केले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर ज्याप्रकारे टीका करत आहे त्यामुळे शरद पवार पटोलेंवर नाराज आहेत. या भेटीच्या माध्यमातून पवारांना काँग्रेसला कडक संदेश द्यायचा आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोनिया गांधींची भेट घेऊ शकतात पवार
पंतप्रधानांना भेटल्यानंतर शरद पवार आजच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे पवार पटोलेंबाबत तक्रार करु शकतात.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 दिवस चालणार असून ते 19 जुलैपासून सुरु होणार आहे. अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रपतीपदासाठी पवारांच्या नावाची होत आहे चर्चा
राज्यात गेल्या काही दिवसापासून आगामी राष्ट्रपती म्हणून शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा केली जात आहे. भाजपविरोधी पक्षाकडून शरद पवारांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 2022 मध्ये संपणार आहे. परंतु, या सर्व दाव्यांबाबत पवारांनी ही बिडबुडाच्या बातम्या असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, तरीदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी 14 सप्टेंबर सुरु झाले होते अधिवेशन
संसदेचे पावसाळी अधिवेशन हे दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होते. स्वातंत्र्य दिनाच्या आधी हे अधिवेशन संपवले जाते. पण गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षीदेखील कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत अधिवेशन घेण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.