आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या आंदोलनावर शहांचा सवाल:निषेधासाठी राम मंदिराच्या पायाभरणीचा दिवस का निवडला, मुद्दाम काळे कपडे घातले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने शुक्रवारी महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सकाळपासून संसद ते रस्त्यावर निदर्शने केली. सर्वप्रथम सोनियांसह काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत काळे कपडे घालून घोषणाबाजी केली.

राहुल संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले. यानंतर प्रियंका गांधी आपल्या खासदारांसह पंतप्रधान निवासाला घेराव घालण्यासाठी बाहेर पडल्या, मात्र इथेही पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.

शहा म्हणाले- आज तर ईडीची चौकशीसुद्धा नव्हती, मग विरोध का?
दिवसभर चाललेल्या या आंदोलनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संध्याकाळी निवेदन दिले. ते म्हणाले- आज ईडीची चौकशी झाली नाही, मग काँग्रेसने विरोध का केला. आज राम मंदिराची पायाभरणी झाली होती. त्याला काँग्रेसने विरोध केला. काळ्या कपड्यांतील आंदोलनावरही शहा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या दिवशी राम मंदिराची पूजा झाली, तोच दिवस आंदोलनासाठी का निवडला, असा सवालही केला. काँग्रेसने आपले तुष्टीकरणाचे धोरण अशा प्रकारे पुढे नेले असल्याचेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.

काँग्रेस मुख्यालयासमोर प्रियंका यांना पोलिसांनी अडवले तेव्हा त्या रस्त्यावरच धरणे देऊ लागल्या. प्रियंका गांधी यांनी पोलिसांना सांगितले की, मी सरकारशी तडजोड करायला बसलेले नाही. महागाईला विरोध करून जनतेचा आवाज बुलंद करणे हा आमचा हक्क आहे.
काँग्रेस मुख्यालयासमोर प्रियंका यांना पोलिसांनी अडवले तेव्हा त्या रस्त्यावरच धरणे देऊ लागल्या. प्रियंका गांधी यांनी पोलिसांना सांगितले की, मी सरकारशी तडजोड करायला बसलेले नाही. महागाईला विरोध करून जनतेचा आवाज बुलंद करणे हा आमचा हक्क आहे.

राहुल ताब्यात, प्रियंका रस्त्यावर बसून राहिल्या
राहुल यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात उपस्थित असलेल्या प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला आणि त्या आपल्या खासदारांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी बाहेर पडल्या, परंतु येथेही पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्या रस्त्यावरच बसून राहिल्या. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी अजय माकन, सचिन पायलट, हरीश रावत, अविनाश पांडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी सर्व नेत्यांना सोडून देण्यात आले.

किंग्जवे कॅम्प येथे पोलीस ताब्यात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर.
किंग्जवे कॅम्प येथे पोलीस ताब्यात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर.

तत्पूर्वी, सकाळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, 'तुम्ही हुकूमशाही करत आहात का, इथे रोज लोकशाहीची हत्या होत आहे. या सरकारने 8 वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त केली. काँग्रेसकडून आज देशभरात केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हातावर काळी पट्टी बांधली होती.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

1. प्रत्येक संस्थेत RSSचा माणूस : देशातील माध्यमे, निवडणूक व्यवस्थेच्या आधारे विरोधी पक्ष उभा राहतो, पण देशातील प्रत्येक संस्थेत RSSचा माणूस बसलेला असतो. तो सरकारच्या ताब्यात आहे. आमचे सरकार असताना पायाभूत सुविधा तटस्थ होत्या. आम्ही त्यात हस्तक्षेप केला नाही. आज ते सरकारकडे आहे. कोणी विरोध केला तर केंद्रीय तपास यंत्रणांना त्याच्या विरोधात उभे केले जाते.

2. आठ वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त : लोकशाहीचा जो मृत्यू झाला आहे, त्यावर तुम्हाला काय वाटते? ज्या लोकशाहीला 70 वर्षांत उभारले होते, ती आठ वर्षांत नष्ट करण्यात आली.

3. मी जेवढे खरे बोलेन, तेवढे हल्ले : माझी अडचण ही आहे की मी खरे बोलेन, मी महागाई, बेरोजगारीचा मुद्दा मांडण्याचे काम करेन. जो घाबरतो तो धमकावतो. आज देशाची जी स्थिती आहे, त्याला घाबरतात. त्यांनी पूर्ण केली नाहीत, ते महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहेत. ते जनतेच्या शक्तीला घाबरतात, कारण ते 24 तास खोटे बोलतात.

मल्लिकार्जुन खर्गे (मध्यभागी) यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून संसदेत पोहोचले.
मल्लिकार्जुन खर्गे (मध्यभागी) यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून संसदेत पोहोचले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे डेरा टाकला आहे. या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार नारेबाजी सुरू आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले होते.

काँग्रेसच्या आंदोलनांशी संबंधित अपडेट्स

  • या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसर वगळता संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
  • काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सरकार आम्हाला महागाईविरोधात आंदोलन करण्यापासून रोखू इच्छिते, त्यामुळे ते काँग्रेस नेत्यांना सतत त्रास देत आहे.
  • राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राहुलजी जे म्हणाले, तुम्ही समजून घ्या की देशात काय परिस्थिती आहे. देशातील जनतेला लोकशाहीचा अंत पाहावा लागेल, असे कुणालाही वाटले नसेल. देशात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची दहशत आहे.
  • दिल्ली, पाटणा, मुंबई, भोपाळसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात निदर्शने केली.

देशभरातून आले कार्यकर्ते, पावसामुळे त्रस्त

महागाईच्या निषेधार्थ देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले होते. पक्षाच्या मुख्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र पावसामुळे सर्व व्यवस्था विस्कळीत झाली होती. कार्यकर्ते रात्रभर उघड्यावर झोपले.

भर पावसात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
भर पावसात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

अकबर रोडवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सुमारे 300 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी कोणत्याही कामगाराला आत प्रवेश दिला जात नाही.

राज्यांत राजभवनावर मोर्चे

काँग्रेसने निदर्शनांप्रकरणी राज्यांतही रणनीती तयार केली आहे. पक्षाचे नेते राजभवनापर्यंत मार्च काढून राज्यपालांना निवेदन सुपूर्द करतील. निदर्शनांवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पक्षाने ब्लॉक-जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनाही मुख्यालयाबाहेर निदर्शने करुन अटक करवून घेण्याचे निर्देश दिलेत.

काँग्रेस मुख्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले.
काँग्रेस मुख्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले.

खासदारांचा राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा, पीएम हाऊसला घेराव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने दोन पातळ्यांवर कामगिरीसाठी रणनीती तयार केली आहे. सर्वपक्षीय खासदार विजय चौकमार्गे राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढतील. त्याचवेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयापासून पीएम हाऊसपर्यंत जातील. येथे ते पीएम हाऊसचा घेराव करणार आहेत.

सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने काँग्रेस मुख्यालयाबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने काँग्रेस मुख्यालयाबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.