आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, यावर सरकार अडून बसले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत यामुळे कामकाज बाधित झाले आणि शेवटी पूर्ण दिवसासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभेत सदस्यांनी भारताला नाटू-नाटू गाणे आणि माहितीपटासाठी ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी राहुल यांचे नाव न घेता संसद आणि संवैधानिक संस्थांचा अवमान केल्याचा आरोप करून माफी मागण्याची मागणी केली. यावर विरोधकांनीही घोषणाबाजी सुरू केली. एक वेळ सभागृह स्थगित झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर गोयल यांनी मागणीचा पुनरुच्चार केला. गोंधळामुळे सभापती जगदीप धनखड पुन्हा कामकाज स्थगित केले. ते म्हणाले की नेत्यांसोबत बैठकीत चर्चा करून यानंतर याप्रकरणी निर्णय घेतला जाईल. लाेकसभेत भाजपने राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली. तर विरोधकांनी अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात जेपीसीची मागणी केली. राहुल यांनी व्हिडिओ जारी करून म्हटले की, संसदेतील अडथळ्यांसाठी सरकारच जबाबदार आहे. ते विरोधकांना जेपीसी चौकशीचा मुद्दा उचलू देत नाही.
विरोधकांची संयुक्त संसदीय समितीची मागणी विरोधकांनी अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली. राहुल गांधी यांनी एका व्हिडिओत म्हटले की, कामकाज बाधित होण्यास सरकारच जबाबदार आहे. ते विरोधकांना अदानी प्रकरणात जीपेसी चौकशीचा मुद्दा उपस्थित करू देत नाहीत. राहुल यांनी कॅम्ब्रीजमधील भाषणात लोकशाही संस्थांवर हल्ले होत असल्याचे म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.