आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Naval Power Discovered On Visakhapatnam Coast Today ..! Navy Prepares For President's Fleet Review | Marathi News

विशाखापट्टणम किनारपट्टीवर आज नौदल शक्तीचा आविष्कार..!:प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यूची नौदलकडून जय्यत तयारी

विशाखापट्टणम / मंगेश फल्ले6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्रप्रदेश मधील हिंद महासागराच्या किनारपट्टीवर वसलेल्या विशाखापट्टणम येथे युद्धजन्य आणि आपत्कालीन परिस्थिती मध्ये नौदलाची सज्जता दाखवून देण्यासाठी सोमवारी (दि.21) प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नौदलाची सक्षमता दाखविण्यासाठी या कार्यक्रमात सुमारे 60 लढाऊ युद्धनौका, पाणबुड्या आणि 55 लढाऊ विमाने विविध कवायती सादर करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहे. यामध्ये भारतीय नौदल,तटरक्षक दल, भारतीय नौव्हन निगम, राष्ट्रीय महासागर प्रद्योगिकी संस्थान हे यात सहभागी झाले आहे.

या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मिनिस्टर ऑफ स्टेट देवसिन्हा चव्हाण,आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी, राज्यपाल बिश्वभूषण हरीचंदन, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार उपस्थित राहणार आहेत.स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद नौदलाची मानवंदना स्वीकारणार असून यावेळी 44 युद्धनौका त्यांना मानवंदना देणार आहे तसेच राष्ट्रपती यांना 21तोफांची सलामी दिली जाणार आहे.आधुनिक युद्ध तंत्र प्रकारात प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कवायत ही जगात सर्व देशामार्फत केली जाते. युद्धाच्या परिस्थितीत नौदल कशाप्रकारे सज्ज आहे, नौदलाची काय क्षमता आहे, शेजारील नौदलाशी कशाप्रकारे समन्वय आहे, युद्धनौका यांची सज्जता कशाप्रकारे आहे हे या सरावातून दाखवले जाते. सर्वात प्रथम भारतात 1953 मध्ये प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू आयोजित करण्यात आला होता. आतापर्यंत 11वेळा प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू यशस्वीपणे आयोजित करण्यात आले असून दर पाच वर्षांनी प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू आयोजित केला जात आहे.

अथांग समुद्रात प्रकाशमान युद्धनौका
प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू हा नौदलाची मनाची कवायत समजली जाते. या कवायती अंतर्गत तिन्ही दलाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपती यांना एका विशेष फॉर्मेशन मध्ये येत मानवंदना दिली जाते. नौदलाची सर्व लढाऊ जहाजे, विनाशिका, पाणबुड्या विमानवाहू जहाज यांचा समावेश या कवयातीत असणार आहे. नौदलातर्फे या कवायतीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नौदलाच्या 40 जहाजांना लायटिंग करण्यात आली असल्याने रविवारी रात्रीच्या अंधारात समुद्राच्या अथांग सागरात प्रकाशमान झालेल्या युद्धनौका नागरिकांना आकर्षित करत होत्या.

मराठयांच्या काळात सर्वप्रथम फ्लीट रिव्ह्यू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वप्रथम नौदलाची सज्जतावर भर देण्यात आला होता. मराठा सरदार कानोहजी आंग्रे यांनी मराठा साम्राज्याचा नौका एकत्र आणत नौदल सक्षमता केल्याचे इतिहासात संदर्भ आढळून येतात.

बातम्या आणखी आहेत...