आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे माजी प्रवक्ते नवीन जिंदल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांना सकाळी तीन मेल आले. त्यात उदयपूरच्या घटनेचा व्हिडिओही जोडण्यात आला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
नवीन जिंदल यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 6.43 च्या सुमारास तीन ईमेल पाठवण्यात आले. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचाही शिरच्छेद केला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांचे उदयपूरच्या घटनेप्रमाणेच केले जाईल, असे मेलमध्ये लिहिले आहे.
मेल आल्याचे twitter वर सांगितलेले
नवीन जिंदल यांनी ट्विटरच्या माध्यमातून धमकी मिळाल्याची पुष्टी केली आहे. मेलचे स्क्रीन शॉट्सही जोडलेले आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ट्विटरवर दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही टॅग केले आहे.
उदयपूर घटनेनंतर धमकी मिळाली
राजस्थानमधील उदयपूरमध्ये मंगळवारी कन्हैयालालची दोन नराधमांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर जिंदल यांना हा मेल आला. जिंदल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.