आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Navi Mumbai Is Ranked Third In The List Of Cleanest Cities In The Country, While Nashik Is Ranked 11th

'स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020':देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक, तर नाशिक 11 व्या क्रमांकावर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातवा क्रमांक पटकावत होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर नाशिक शहराने 11 वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्र सरकारने नुकतेच 'स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020' चे निकाल जाहीर केले. यामध्ये इंदुर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदुर ने बाजी पहिला क्रमांक पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नवी मुंबईचा तिसरा क्रमांक लागला आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ मध्ये नवी मुंबई शहर देशात सातव्या क्रमांकावर होतं. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचे हे पाचवे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरं कितव्या क्रमांकावर

 • नाशिक 11
 • ठाणे 14
 • पुणे 15
 • नागूपर 18
 • कल्याण डोंबिवली 22
 • पिंपरी चिंचवड 24
 • औरंगाबाद 26
 • वसई-विरार 32
 • मुंबई 35
बातम्या आणखी आहेत...