आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांच्या ग्रँड वेलकमची तयारी सुरू झाली आहे. लुधियानाच्या रस्त्यावर त्यांचे ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेत. त्यावर त्यांचा उल्लेख पंजाब, पंजाबी व पंजाबियतचा संरक्षक म्हणून करण्यात आला आहे. या पोस्टर्सवर सिद्धूंचे माध्यम सल्लागार सुरिंदर डल्ला यांचाही फोटो आहे.
सिद्धूच्या सुटकेवर सस्पेन्स
नवज्योत सिद्धू पटियालाच्या तुरुंगात बंदिस्त आहेत. पण त्यांच्या सुटकेची चर्चा रंगली आहे. त्यांची सुटका होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांचे समर्थक त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी तुरुंग विभाग 52 कैद्यांची सुटका करणार आहे. त्यात सिद्धूंच्या नावाचा समावेश आहे.
या 52 कैद्यांची सुटी तुरुंग विभागाने पंजाब सरकारला पाठवली आहे. नियमानुसार ही यादी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यपालांना पाठवली जाते. पण मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी येत्या 1 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे कारागृह विभागाने पाठवलेली सूचीला उशिराने मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळेही सिद्धूच्या सुटकेवर सवाल उपस्थिति केला जात आहे.
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण सिद्धूंना देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धूचे कुटुंब या यात्रेत सहभागी झाले होते. सिद्धूंची 26 जानेवारी रोजी सुटका झाली तर ते या यात्रेच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधींना भेटतील.
सिद्धूंच्या समर्तथकांत आनंदाची लाट
नवज्योतसिंग सिद्धूच्या सुटकेमुळे काँग्रेस पक्ष व सिद्धूच्या समर्थकांत आनंदाची लाट पसरली आहे. 26 जानेवारीला सिद्धूची सुटका झाली, तर सोनिया गांधी त्यांच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात, अशी चर्चा आहे. सिद्धू यांचे फलक शहरात लावण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह दिसून येत आहे.
रोड रेज प्रकरणात शिक्षा
रोड रेजच्या एका 34 वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. 1988 साली पंजाबमध्ये त्यांच्या हातून अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूची निर्दोष सुटका केली होती. तसेच एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी करताना त्यांना 1 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर सिद्धूंनी 20 मे रोजी आत्मसमर्पण केले होते.
सुरिंदर डल्ला यांनी फलक लावले
पंजाबचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी 2 मीडिया सल्लागारांची नियुक्ती केली होती. त्यांनी जगतार सिंग सिद्धू व सुरिंदर डल्ला यांना त्यांचे मीडिया सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर सिद्धूंनी माध्यमांपासून अंतर राखले होते.
पंजाबच्या अमरिंदर सिंग सरकारमधून 2019 मध्ये बाहेर पडल्यानंतर सिद्धू एखाद-दुसरा प्रसंग वगळता कधीही मीडियाशी बोलले नाही. ते केवळ ट्विटद्वारे आपली बाजू मांडत होते. पण पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना मीडियापासून अंतर राखणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी स्वतःचे माध्यम सल्लागार नेमले होते. हे पोस्टर्स त्यांचे सल्लागार डल्ला यांनी लावल्याची चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.