आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते सुनील जाखड यांची जागा घेतील. ही नियुक्ती तत्काळ लागू होईल. सिद्धूंसोबत चार कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगतसिंग गिल्जियान, सुखविंदरसिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजितसिंग नागरा यांचा त्यात समावेश आहे.
पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने रविवारी सायंकाळी याबाबतचे पत्र जारी करण्यात आले. त्यात म्हटले की, पक्षाने कुलजितसिंग नागरा यांना सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुराच्या प्रभारी पदातून मुक्त केले आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष करण्यास विरोध होता. राज्यातील काँग्रेस खासदारांनी रविवारी राज्यसभा सदस्य प्रतापसिंग बाजवा यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. तीत ११ पैकी ९ खासदार सहभागी झाले. त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धू यांची पक्ष संघटनेवर कुठलीही पकड नाही, असे हे खासदार सोनियांना सांगणार होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.