आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवेमारण्याची धमकी आली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेविरोधात बोलल्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केला असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकणी नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एफआयआरची प्रत ही 13 फेब्रुवारी 2021 ची आहे.
नवनीत राणा यांनी तक्रारीत काय म्हटले आहे?
नवीनत राणे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील माझ्या भाषणाविरोधात शिवसेनेचे लेटरहेड असलेले निनावी पत्र आले आहे. या पत्रामधून अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. यासोबतच आठ दिवसांमध्ये मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली असल्याचे नवनीत कौर राणा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळांनी हे पाठवले आहे. लोकशाहीसाठी असे शब्द अजिबात चांगले नाहीत. आपल्यासंबंधी अश्लील शब्दांचा वापर करून धमकी देणारे फोनही करण्यात येत आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा आहे असल्याचे नवीनत राणा यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.