आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Admiral Hari Kumar Covid Positive; Navy Chief, Narendra Modi Shivraj Chouhan | Corona

शुभारंभ:मोदींनी राणी कमलापती - निजामुद्दीन वंदे भारत रेल्वेला दाखवली हिरवी झेंडी; म्हणाले - काहींचा माझी कबर खोदण्याचा संकल्प

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाच्या 11 व्या व मध्य प्रदेशातील पहिल्या वंदे भारत रेल्वेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. रेल्वे प्रवासात मोदींनी मुलांशीही संवाद साधला. 300 हून अधिक या मुलांची निवड निबंध स्पर्धेतून झाली होती. ही रेल्वे राणी कमलापती स्टेशनहून हजरत निजामुद्दीन स्टेशनपर्यंत धावेल.

PM मोदींनी सर्वप्रथम इंदूरमधील दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यानंतर ते म्हणाले - देशात विकासासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. 2014 पासून देशातील काही लोकांनी मोदींची प्रतिमा डागाळण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी तसा संकल्पही केला आहे. या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना सुपारी दिली आहे. त्यांनी स्वत:ही मोर्चा सांभाळला आहे. त्यांची साथ देणारे काहीजण देशात तर काहीजण देशाबाहेर आहेत. ते सातत्याने मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज प्रत्येक भारतीय मोदींचे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे हे लोक संतापलेत. ते नवनव्या युक्त्या करत आहेत. त्यांनी 2014 मध्ये मोदींची प्रतिमा डागाळण्याची शपथ घेतली होती. आता ते माझी कबर खोदण्याच्या प्रयत्नांत आहेत.

ट्रेनच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी तिन्ही सेवांच्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला हजेरी लावली. भोपाळच्या कुशाभाऊ ठाकरे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक 5 तास (सकाळी 10.5 ते 3.05) चालली. पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही भोपाळला पोहोचलेत.

पंतप्रधान म्हणाले...

  • आतापर्यंत रेल्वेस्थानकावर थांबणे शिक्षेसारखे होते. अनेक रेल्वे विलंबाने धावत होत्या. आज तक्रारी नाममात्र आहेत. प्रवासात एखाद्या प्रवासाला काही त्रास झाला तर तत्काळ कारवाई केली जाते. आपत्कालीन स्थितीतही अत्यंत कमी वेळात मदत केली जाते.
  • हा कार्यक्रम ठरवला गेला, तेव्हा मला सांगण्यात आले की 1 तारखेला कार्यक्रम आहे. मी विचारले 1 एप्रिल रोजी का ठेवण्यात आला? पेपरमध्ये 1 एप्रिलला मोदी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवणार असल्याचे वृत्त आले तर ते लोकांना एप्रिल फूल वाटेल. काँग्रेसचे नेतेही यावरून आमच्यावर टीका करतील.
  • आतापर्यंतची सरकारने देशातील एकाच कुटुंबाला देशाचे प्रथम कुटुंब मानत होती. गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांनी वाऱ्यावर सोडले होते. त्यांच्या आशा, अपेक्षा विचारणारे कुणीच नव्हते.
  • स्वातंत्र्याला भारताला खूप मोठे रेल्वे नेटवर्क तयार मिळाले होते. त्याच्या मदतीने तत्कालीन सरकाराने वेगाने रेल्वेचे आधूनिकीकरण करता आले असते. पण राजकीय स्वार्थासाठी रेल्वेच्या विकासाचा बळी देण्यात आला.
  • स्वातंत्र्यानंतर एवढ्या दशकांनंतरही ईशान्येतील राज्यांना रेल्वेशी जोडता आले नाही. 2014 मध्ये तुम्ही मला सेवेची संधी दिली. त्यानंतर मी रेल्वेचा कायाकल्प करण्याचा निश्चय केला. गत 9 वर्षांत सरकार भारतीय रेल्वे जगातील सर्वश्रेष्ठ रेल्वे नेटवर्क बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

अपडेट्स...

  • राणी कमलापतीच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले, आज मध्य प्रदेशाच्या नशिबाच्या उदयाचा दिवस आहे.
  • रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधान 1200 स्थानकांना वर्ल्ड क्लास बनवत आहेत. यात मध्य प्रदेशातील 80 स्टेशन्सचा समावेश आहे.
  • PM मोदींचा ताफा जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याशेजारच्या कुटुंबांना पोलिसांनी 2 तासांपर्यंत त्यांच्या घरात नजरबंद केले होते. दुकानेही बंद केली होती. माध्यमांनाही रोखण्यात आले होते.
  • काळे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांनाही राणी कमलापती रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.

नौदल प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह, दिल्लीला परतले

पंतप्रधानांच्या परिषदेपूर्वी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार कोरोना यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे ते परिषद अर्धवट सोडून दिल्लीला परतले. ते शुक्रवारी सायंकाळी एका विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले.

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार
नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार

पंतप्रधान मोदींचे आगमन होण्यापूर्वी परिषद व त्यांच्या सुरक्षेत तैनात 1300 कर्मचारी-अधिकाऱ्यांची टेस्ट करण्यात आली होती. यात डॉक्टर व सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात नौदल प्रमुखांसह 22 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सर्वांना ड्यूटीवरून हलवण्यात आले आहे. यापैकी एकातही गंभीर लक्षण नाही.

पंतप्रधान मोदींनी दुपारी राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून देशाच्या 11 व्या वंदे भारत रेल्वेने हिरवा कंदील दाखवणार आहेत. ते या रेल्वेत मुलांशीही संवाद साधणार आहेत. पीएम शनिवारी सकाळी 9.25 वा. दिल्लीहून एका विशेष विमानाने भोपाळच्या राजाभोज एअरपोर्टवर आले. येथून 9.30 वा. हेलिकॉप्टरने लाल परेड मैदानाच्या हेलिपॅडला पोहोचले. येथेून ते कारने सकाळी 10 वा. कुशाभाऊ ठाकरे कन्व्हेंशन सेंटरमधील संयुक्त कमांडर्स परिषदेला पोहोचले. त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही आहेत.

राजाभोज विमानतळावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे स्वागत केले. इंदूरमधील दुर्घटनेमुळे मोदींचा स्वागत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
राजाभोज विमानतळावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे स्वागत केले. इंदूरमधील दुर्घटनेमुळे मोदींचा स्वागत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

अपडेट्स...

  • पंतप्रधानांच्या ताफ्यात कुत्रे व अन्य भटके प्राणी येऊ नये म्हणून त्यांची धरपकड करण्यात आली.
  • काळे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांना राणी कमलापती स्टेशनकडे जाण्यास मनाई करण्यात आली. मोदींच्या भेटीनंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

इंदूर दुर्घटनेमुळे रोड शो रद्द

मोदींचा गत 7 महिन्यांतील हा चौथा मध्य प्रदेश दौरा आहे. इंदूरमधील मंदिर दुर्घटनेमुळे पंतप्रधानांचे स्टेट हँगरमध्ये स्वागत करण्यात आले नाही. रोड शो व पुष्पवृष्टीचा कार्यक्रमही स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, पंतप्रधान मोदींचे आगमन म्हणजे मध्य प्रदेशसाठी भाग्याचा सूर्य उगवल्यासारखा आहे.

पंतप्रधान मोदींचा हा 7 महिन्यांतील चौथा मध्य प्रदेश दौरा आहे. आज सकाळी 9.25 वा. ते एका विशेष विमानाने येथे आले.
पंतप्रधान मोदींचा हा 7 महिन्यांतील चौथा मध्य प्रदेश दौरा आहे. आज सकाळी 9.25 वा. ते एका विशेष विमानाने येथे आले.
राजाभोज विमानतळावरून पंतप्रधान हेलिकॉप्टरद्वारे लाल परेड मैदानात पोहोचले. येथे त्यांचे स्वागत भोपाळचे जिल्हा प्रभारी मंत्री भूपेंद्र सिंह यांनी केले.
राजाभोज विमानतळावरून पंतप्रधान हेलिकॉप्टरद्वारे लाल परेड मैदानात पोहोचले. येथे त्यांचे स्वागत भोपाळचे जिल्हा प्रभारी मंत्री भूपेंद्र सिंह यांनी केले.
लाल परेड मैदानातून मोदी कारने कुशाभाऊ कन्व्हेंशन सेंटरला पोहोचले. येथे होणाऱ्या कमांडर्सच्या बैठकीत ते जवळपास 5 तास राहतील.
लाल परेड मैदानातून मोदी कारने कुशाभाऊ कन्व्हेंशन सेंटरला पोहोचले. येथे होणाऱ्या कमांडर्सच्या बैठकीत ते जवळपास 5 तास राहतील.

काँग्रेस मीडिया विभागाच्या उपाध्यक्षा निगराणीखाली

मध्य प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाच्या उपाध्यक्षा संगीता शर्मा यांना पोलिसांनी निगराणीखाली ठेवले आहे. पोलिस त्यांच्या होशंगाबाद (नर्मदापुरम) रोडवरील घरी पोहोचले. शर्मा यांचा मोदींच्या दौऱ्यात निदर्शने करण्याचा हेतू होता. त्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली. काँग्रेस नगरसेवक योगेंद्र गुड्डू चौहान यांच्या 6 क्रमांकाच्या कार्यालयावरही पोलिसांची नजर आहे.