आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Navy Converts Aircraft With Medical ICU For Critical Patients Evacuation MICU In Helicopter During Corona Pandemic; News And Live Updates

नौदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये ICU:गंभीर रूग्णाला कोणत्याही हवामानात रुग्णालयात दाखल करता येणार, आपत्कालीन परिस्थितीसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा आधार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • HAL ने नौदलाला MICU चा पहिला सेट दिला

देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहेत. याला रोखण्यासाठी तिन्ही दलाचे सैन्य काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर नौदलाने आपल्या हेलिकॉप्टरमध्ये मेडिकल इंटेंसिव्ह केअर युनिट (MICU) बसविला आहे. त्यामुळे आता गंभीर रुग्णाला कोणत्याही हवामानात रुग्णालयात दाखल करता येऊ शकते. त्यासोबसच आपत्कालीन परिस्थितीसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा आधारदेखील असणार आहे. विशेष म्हणजे नौदलाचे हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर (ALH) MK III कोणत्याही हवामानात उड्डाण घेऊ शकते.

या विमानात मेडिकल इंटेंसिव्ह केअर युनिट MICU ची सुविधा हिन्दूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने बसविले आहे. भारतीय नौदल एअर स्क्वॅड्रॉन (INAS) 323 चे ALH MK III विमान आयएनएस हंसावर आहे.

हेलिकॉप्टरमध्ये सक्शन सिस्टमची सुविधा
आपत्कालीन परिस्थितीत MICU च्या अंतर्गत हेलिकॉप्टरमध्ये 2 डिफिब्रिलेटर, मल्टीपारा मॉनिटर्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट, इन्फ्युशन आणि सिरिंज पंप जोडण्यात आले आहे. यामध्ये एक सक्शन सिस्टमदेखील लावण्यात आले आहे. ज्यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला अडचण जात नाही.

HAL ने नौदलाला MICU चा पहिला सेट दिला
MICU ची यंत्रणा फक्त हेलिकॉप्टरच्या वीजपुरवठ्यातून केली जाणार असून यात 4 तासांचा बॅटरी बॅकअप असणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हेलिकॉप्टरमध्ये ही उपकरणे 2 ते 3 तासांत स्थापित केली जाऊ शकतात. त्यानंतर हे हेलिकॉप्टर एअर रुग्णवाहिकेत रूपांतरित होईल. HAL ने नौदलाला हा एमआयसीयू सेट्स 8 मे पुर्वीच तयार करुन दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...