आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेव्हीचे विमान क्रॅश:नौदलातील ट्रेनी एअरक्राफ्ट MiG-29K अरबी समुद्रात कोसळले; एक वैमानिक सुरक्षित, दुसऱ्याचा शोध सुरू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नौदलातील ट्रेनी एअरक्राफ्ट MiG-29K गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता क्रॅश होऊन अरबी समुद्रात कोसळले. याची माहिती शुक्रवारी सकाळी समोर आली. या अपघातात एक वैमानिक सुरक्षित असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

MiG-29 एअरक्राफ्ट कॅरिअर विक्रमादित्यवरुन ऑपरेट होते. काही दिवसांपूर्वीच मलाबारमध्ये भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त युद्धाभ्यासात MiG विमानांनी भाग घेतला होता.

यावर्षीय MiG-29K चा तिसरा अपघात आहे. फेब्रुवारीमध्ये गोव्यात रुटीन सॉर्टी (प्रॅक्टिस उड्डाण)दरम्यान नेव्हीचे MiG क्रॅश झाले होते. तेव्हा वैमानिकाने स्वतःला सुरक्षितरित्या बाहेर काढले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser