आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप हैदराबादला नवाब व निजाम संस्कृतीपासून मुक्त करेल आणि येथे एक मिनी-इंडिया बनवेल. हैदराबादला आधुनिक शहर करायचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी निवडणूक प्रचारादरम्यान जाहीरपणे सांगितले. १ डिसेंबर रोजी ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणूक होऊ घातली आहे. त्याच्या प्रचारासाठी भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. रविवारी अमित शहा यांनी रोड-शो केला. त्यानंतर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. शहा यांनी तेलंगणा सरकारवर निशाणा साधला. गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल मी हैदराबादच्या लोकांचा आभारी आहे. भाजप आपल्या जागा वाढवण्यासाठी आणि अस्तित्व दाखवण्यासाठी लढत नसल्याचे मला आजच्या रोड-शोमधून दिसून आले. ही गोष्ट आश्वस्त करणारी वाटते. आम्ही जागा बळकट करण्यासाठी लढत आहोत. किंबहुना हैदराबादचा महापौर भाजपचा असेल. हैदराबाद पालिकेत सध्या टीआरएस सत्तेवर आहे. भाजप कशा प्रकारे काम करते, ही गोष्ट भारतातील लोकांना ठाऊक आहे. ते माहीत असल्यामुळेच जनता आम्हाला मतदान करते. खरे तर हैदराबादेत पायाभूत विकास व्हायला हवा. पैसा भलेही राज्य किंवा केंद्राचा असावा. मात्र टीआरएस व काँग्रेस अंतर्गत पालिकेचा कारभार हाच विकासातील अडथळा ठरतो.
केरळमध्ये हैदराबाद मॉडेल
हैदराबादची लोकसंख्या केरळसारखी आहे. केरळप्रमाणाचे मुस्लिम लोकसंख्या २५ टक्क्यांहून जास्त आहे. येथे मिळालेला धडा भाजप केरळमध्ये लागू करू शकते.
ममतांच्या मतांत घट होणार
असदुद्दीन आेवेसी यांच्या एआयएमआयएमचा हैदराबादमध्ये जास्त प्रभाव आहे. भाजप-एमआयएम यांच्यातील निवडणूक लढाई चर्चेत आल्यापासून पश्चिम बंगालमध्ये आेवेसी समर्थित अनेक उमेदवारांना बळ मिळणार आहे. आेवेसी यांनी अशी कामगिरी बिहारमध्ये केली आहे. एमआयएमला पाच जागी विजय मिळाला. त्याचा फायदा रालोआला मिळाला. पुढील वर्षी निवडणुकीत ममतांच्या मतांमध्ये अशीच घट होऊ शकते.
हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपचे राजकीय डावपेच खरे ठरले तर पक्षाला त्याचा लाभ इतर राज्यांतही मिळू शकतो. दक्षिणेचा विचार केल्यास तेलंगणात भाजप बळकट होईल. केरळमध्ये लढाईसाठी एक मॉडेल मिळेल. त्याचबरोबर पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीतही लाभ होऊ शकतो.
हैदराबाद पालिका
मतदान - १ डिसेंबर
निकाल - ४ दिसंबर
एकूण जागा (वार्ड््स) - १५० पालिका
बजेट - ५,३८० कोटी
मतदार - ७४ लाखांहून जास्त
हैदराबादची लोकसंख्या - ८२ लाखांपेक्षा जास्त
केरलमध्ये 45 %मतदार अल्पसंख्यांक
54.72% हिंदू
26.56% मुस्लिम
18.38% ख्रिश्चन
0.33% इतर
हैदराबाद : ३५% लोकसंख्या अल्पसंख्याक
64.93% हिंदू
30.13% मुस्लिम
2.75% ख्रिश्चन
2.19% इतर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.