आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छत्तीसगडच्या सुकमा येथे आयईडी स्फोटात शनिवारी रात्री कोबरा बटालियनचे सहायक कमांडंट नितीन भालेराव शहीद झाले. सेंकड इन कमांड दिनेश सिंह यांच्यासह 9 जवान जखमी झाले. यापैकी 7 जणांना उपचारासाठी रायपुरच्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर 2 जवानांवर सुकमा येथील कँपमध्ये उपचार सुरू आहेत. चिंतागुफा परिसरात ही घटना घडली.
चिंतलनार, बुरकापाल आणि चिंतागुफा कँपपासून COBRA, STF आणि DRGचे जवान अँटी नक्षल मोहिमेसाठी चिंतागुफा येथे पोहोचले होते. रात्री सुमारे 8.30 वाजता अरबराज मेट्टा डोंगराजवळ IEDचा स्फोट झाला. या स्फोटात COBRA 206 व्या बटालियनचे सेकंट इन कमांड दिनेश सिंह आणि सहायक कमांडंट नितीश भालेराव यांच्यासह 10 जवान जखमी झाले.
घटनेनंतर सर्व जखमींना चिंतलनार येथील रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा त्यांना रायपुरला हलवण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान नितीन भालेराव यांची प्राणज्योत मालवली. नितीश महाराष्ट्रच्या नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते.
प्रत्युत्तरात नक्षलवादी पळून गेले
नक्षलवाद्यांनी IED स्फोटसह लपून बसले होते. IEDच्या स्फोटानंतर त्यांनी गोळीबारही केला. यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिले. काही वेळ चकमक झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमी साथीदारांना घेऊन कँपकडे परतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.