आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Naxal Attack On Chhattisgarh Odisha Border, 3 Jawans Martyred, Latest News And Update

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर नक्षल्यांचा हल्ला:3 जवान शहीद, रोड ओपनिंग पार्टी ड्युटीवर निघताना घात लावून केला गोळीबार

गरियाबंद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगड-ओडिशाच्या सीमेवर मंगळवारी पोलिस-नक्षलवाद्यांत भीषण चकमक झाली. त्यात CRPF चे 3 जवान शहीद झाले. CRPF ची रोड ओपनिंग पार्टी ड्युटीवर निघाली होती. त्यावेळी अचानक त्यांच्यावर घात लावून बसलेल्या नक्षल्यांनी हल्ला केला. यावेळी जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, ओडिशाच्या नुवापारा जिल्ह्यात सीआरपीएफच्या 19 बटालियनचे जवान रोड ओपनिंग ड्युटीवर निघाले होते. त्यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एएसआय-शिशुपाल सिंह, एएसआय-शिवलाल व कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंह हे तिघे शहीद झाले आहेत.

जंगलात झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले.
जंगलात झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर जवानांनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी जंगलाच्या दिशेने पलायन केले. सध्या नक्षलवाद्यांचा माग काढण्यासाठी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पण वनक्षेत्र असल्याने यासंबंधीची फारशी माहिती उजेडात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...