आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Naxalites Of ULFA In Myanmar, Bhutan; Arms Logistics From Pakistan | Marathi News

कुरापती:म्यानमार, भूतानमध्ये उल्फाच्या नक्षलींचे अड्डे; पाकिस्तानकडून शस्त्रांची रसद

दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममधील निर्बंध असलेली संघटना उल्फाच्या नक्षली कारवाया सातत्याने वाढू लागल्या आहेत. गुप्तचरांच्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आसाममध्ये उल्फा नक्षलींना बांगलादेश मार्गे शस्त्रास्त्र पुरवठा करत आहे. उल्फाच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भूतान व म्यानमारमध्ये गुप्तपणे अड्डे चालवले जात आहेत. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या एका प्रशिक्षण अड्ड्याचा पर्दाफाश भारतीय गुप्तचर संस्थेने केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आसामच्या ७ जिल्ह्यांत उल्फाच्या कारवाया दिसून आल्या आहेत. या प्रकरणात १८ मे २०२२ रोजी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यांत १६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. तेथे नक्षलींसाठी बांगलादेशहून आलेली शस्त्रास्त्रे तसेच संवेदनशील दस्ताऐवज जप्त केले होते. उल्फा आपल्या कारवायांसाठी नवीन भरती करत आहे. तरूणांना भूतान व म्यानमारमधील अनेक गुप्त अड्यांवर प्रशिक्षण दिले जात आहे.

१५० ची भरती : अलीकडे गृह मंत्रालयाने आपल्या अहवालात उल्फा आसामसोबतच दिल्ली-एनसीआरपर्यंतच्या तरूणांची भरती करण्याच्या कुरापती करत असल्याने नमूद करण्यात आले. काही महिन्यांत सुमारे १५० तरूणांची भरती केली आहे. संघटना अपहरणासह सामान्य नागरिकांवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. या अहवालानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे तपास सोपवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...