आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूचा उपदेश:नक्षलवाद्यांनी लष्करासाठी बाॅम्ब पेरले, स्फाेटात स्वत:च उडाले, लटकले अवयव

कांकेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात, आधी ते त्यात पडतात...

छत्तीसगडच्या बस्तरमधील आमाबेदा येथे नक्षलवादी लष्कराला उडवण्यासाठी बाॅम्ब पेरत हाेतेे, पण ताे पेरताना ते स्वतःच उडाले. बॉम्ब इतका शक्तिशाली होता की डीव्हीसी सदस्याच्या चिंधड्या झाडावर लटकलेल्या दिसल्या. दोन नक्षलवादी जखमीही झाले. या संदर्भात नक्षलवाद्यांनी फलकही लावला आहे. यात १८ फेब्रुवारीला आमाबेदामधील चुकपालमध्ये सकाळी ६.१५ वाजता एक घटना घडली. यात कांकेरच्या आलदंड, कंदाडी निवासी साेमजी ऊर्फ सहदेव वेडदा याचा मृत्यू झाला असे म्हटले आहे. ताे डीव्हीसी सदस्य हाेता. उत्तर बस्तर विभागीय समितीचे प्रवक्ते सुखदेव कावडे यांच्या पत्रकात लष्कराला उडवण्यासाठी बाॅम्ब लावताना स्फाेट झाल्याचे म्हटले आहे.

काळ्या कृत्याची झाडे बनली साक्षीदार
स्फाेटात नक्षलवादी डीव्हीसी सदस्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. येथील आसपासची झाडे नक्षलवाद्यांच्या या काळ्या कृत्याची साक्षीदार बनली. नक्षलवाद्याच्या शरीराचा काही हिस्सा व फाटलेले कपडे झाडात जाऊन अडकले.

बीएसएफला करायचे हाेते लक्ष्य : चुकपाल भागात ज्या ठिकाणी स्फाेट झाला तेथे आसापास एकच नाही तर अनेक प्रेशर बाॅम्ब पेरण्यात आले हाेते. स्फाेटानंतर नक्षलवाद्यांनी ते पुन्हा बाहेर काढले आणि तेथे त्याचे लहान लहान खड्डे आढळून आले. तसेच या ठिकाणी खेचण्याच्या तंत्राने लावलेच्या बाॅम्बच्या तारा आणि रबर ट्यूबही मिळाल्या आहेत. काही अंतरावरच बाेडागावमध्ये बीएसएफचा कॅम्प आहे. गस्तीसाठी बाहेर पडलेले सैनिक परतताना छावणीच्या जवळ आले की थाेडे निवांत हाेतात आणि छावणीच्या जवळ एखादी जागा बघून आराम करतात. हे लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी हल्ल्याची तयारी केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...