आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCERT ने अभ्यासक्रमातून हटवला मोगलांचा इतिहास:काँग्रेस, कम्युनिस्ट व जनसंघाचे धडेही हटवले; याच सत्रापासून बदल लागू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT ने 12 वीचा इतिहास, नागरिकशास्त्र आणि हिंदीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. इतिहासाच्या पुस्तकातून मोगल साम्राज्याशी संबंधित प्रकरण हटवण्यात आले आहे. याशिवाय हिंदीच्या पुस्तकातील काही कविता आणि उतारे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री-पार्ट II मधून मोगल दरबार (16 वे आणि 17 वे शतक) आणि शासक आणि त्यांच्या इतिहासाशी संबंधित प्रकरण हटवण्यात आले आहेत. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून 'यूएस हिजेमेनी इन वर्ल्ड पॉलिटिक्स' आणि 'द कोल्ड वॉर एरा'सारखी प्रकरणे हटवण्यात आली आहेत.

याशिवाय, स्वतंत्र भारताचे राजकारण या पुस्तकातून 'जन आंदोलनाचा उदय' आणि 'एका पक्षाच्या वर्चस्वाचा कालखंड' हटवण्यात आले आहेत. यात काँग्रेसचे वर्चस्व, सोशलिस्ट, कम्युनिस्ट पक्ष आणि सीपीआय, भारतीय जनसंघ इ. शिकवले जाते.

11 वीचे पुस्तक 'थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री'मधून सेंट्रल इस्लामिक लँडस, संस्कृतींचा संघर्ष आणि द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनसारखे धडे हटवण्यात आले आहेत.
11 वीचे पुस्तक 'थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री'मधून सेंट्रल इस्लामिक लँडस, संस्कृतींचा संघर्ष आणि द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनसारखे धडे हटवण्यात आले आहेत.

हिंदीच्या पुस्तकातून गझल आणि गाणेही हटवले

NCERT ने हिंदी विषयाच्या अभ्यासक्रमातही काही बदल केले आहेत. यात हिंदी आरोह भाग-2 च्या पुस्तकातून फिराख गोरखपुरींची गझल आणि अंतरा भाग दोनमधून सूर्यकांत त्रिपाठी निरालांचे गीत गाने दो मुझे हटवण्यात आले आहे. याशिवाय विष्णू खरे यांचे एक काम आणि सत्यही हटवण्यात आले आहे.

सेंट्रल इस्लामिक लँडस धडा शिकवला जाणार नाही

सध्याच्या सत्रातून होणारे बदल केवळ 12 वी पुरतेच मर्यादित नसून 10 वी आणि 11 वीच्या इयत्तेतील पुस्तकांतूनही अनेक धडे हटवण्यात आले आहेत. 11 वीचे पुस्तक 'थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री'मधून सेंट्रल इस्लामिक लँडस, संस्कृतींचा संघर्ष आणि द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनसारखे धडे हटवण्यात आले आहेत. अशाच प्रकारे 10 वीचे पुस्तक लोकशाही राजकारण-2 मधून लोकशाही व विविधता, लोकप्रिय संघर्ष व आंदोलन, लोकशाहीसमोरील आव्हाने असे धडे हटवण्यात आले आहेत.

स्वतंत्र भारतातील राजकारण पुस्तकातून जन आंदोलनाचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा कालखंड हे हटवण्यात आले आहेत.
स्वतंत्र भारतातील राजकारण पुस्तकातून जन आंदोलनाचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा कालखंड हे हटवण्यात आले आहेत.

सीबीएसई आणि यूपीसह अनेक स्टेट बोर्डांत लागू होईल

अभ्यासक्रमातील हा बदल देशभरातील त्या सर्व शाळा व महाविद्यालयांत लागू होईल जिथे अभ्यासक्रमात NCERT च्या पुस्तकांचा समावेश आहे. यात सीबीएसई आणि युपी बोर्डाच्या पुस्तकांचाही समावेश आहे. NCERT नुसार अभ्यासक्रमातील बदल शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू होतील.

उत्तर प्रदेश बोर्डाचे सचिव दिव्यकांत शुक्लांनी क्लास 10, 11 आणि 12 वीच्या नव्या अभ्यासक्रमाला दुजोरा देत म्हटले की यात बदल करण्यात आले आहेत. युपी बोर्डाचा अभ्यासक्रम 2023-24 च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केला जाईल.

ही बातमीही वाचा...

सुनावणी:मानहाणीच्या प्रकरणात राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयात जामीन, शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 13 एप्रिल रोजी सुनावणी