आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mahatma Gandhi History In NCERT 12th Syllabus; Nathuram Godse | RSS | Mahatma Gandhi

बदल अन् वाद:NCERT ने गांधींशी संबंधित अनेक गोष्टी वगळल्या; गोडसेचा ब्राह्मण संबंध, गुजरात दंगलीचा भागही हद्दपार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) 12वीच्या अभ्यासक्रमातून महात्मा गांधी, नथुराम गोडसे व RSS शी संबंधित काही माहिती वगळली आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जून 2022 मध्ये एनसीईआरटीने एक यादी जारी केली होती. त्यात त्यांच्या पुस्तकांमधून काय वगळले जाईल व काय जोडले जाईल हे नमूद करण्यात आले होते.

आता NCERT वर या यादीत नसलेला महात्मा गांधींशी संबंधित काही भाग वगळल्याचा आरोप झाला आहे. नवी पुस्तके बाजारात आली आहेत. NCERT च्या माहितीनुसार, नवा सिलॅबस शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू होणार आहे. अनेक सुधारित पुस्तके बाजारात आली आहेत.

शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

आता वाचा काय-काय वगळले?

हिंदी पुस्तकातून गझल व गाणी वगळली

NCERT ने हिंदीच्या अभ्यासक्रमातही काही बदल केलेत. यापैकी फिराक गोरखपुरी यांची हिंदी आरोह भाग-2 या पुस्तकातील गझल व अंतरा भाग-2 मधील सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे गाणे दो मुझे हे गाणे वगळण्यात आले आहे. याशिवाय विष्णू खरे यांचे एक काम और सत्यही वगळण्यात आले आहे.

सेंट्रल इस्लामिक लँड्स चॅप्टरही शिकवला जाणार नाही

चालू सत्रापासून होणारे बदल केवळ 12वीपर्यंतच मर्यादित नसून इयत्ता 10वी व 11वीच्या पुस्तकांमधूनही काही प्रकरणे वगळण्यात आली आहेत. 'थीम इन वर्ल्ड हिस्ट्री' या इयत्ता 11वीच्या पुस्तकातून 'सेंट्रल इस्लामिक लँड्स', 'क्लॅश ऑफ कल्चर्स' व 'द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन' सारखी प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत. याशिवाय 10वीच्या लोकशाही राजकारण-2 या पुस्तकातून लोकशाही व विविधता, लोकप्रिय चळवळी, लोकशाहीची आव्हाने आदी प्रकरणेही वगळण्यात आली आहेत.

स्वतंत्र भारताच्या राजकारणातील पुस्तकातून ‘जन आंदोलन का उदय’ व ‘एक दल के प्रभुत्व का दौर’ वगळण्यात आला आहे.

प्रकरणाशी संबंधित 2 मोठी राजकीय विधाने

भाजप नेते कपील मिश्रा यांनी NCERT च्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, इतिहासाच्या पुस्तकात चोरांना मुघल साम्राज्य व भारताचा बादशहा नमूद करण्यात आले होते. या पुस्तकातून खोटा इतिहास वगळण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.

दुसरीकडे, खासदार कपील सिब्बल यांनी NCERT च्या या निर्णयावर टीका केली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हणाले की, आधूनिक भारताचा इतिहास भाजप सत्तेत आल्यापासून म्हणजे 2014 पासून सुरू झाला पाहिजे.

कुणाचाही दबाव नाही - NCERT

NCERT चे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान झाले. मुले तणावात राहिली. त्यामुळे पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके व्हावे असे आम्हाला वाटले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. एनसीईआरटीने हे बदल कोणत्याही विचारसरणीच्या दबावाखाली केला नाही, असेही ते यावेळी ठामपणे म्हणाले.