आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनसीईआरटीने बारावी वर्गाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करताना मोगल साम्राज्याचा धडा हटवला आहे. साेबतच अनेक धडे वगळण्याचाही निर्णय घेतला आहे. एनसीईआरटीने इतिहासाचे पुस्तक ‘थीम्स आॅफ इंडियन हिस्ट्री पार्ट-२’ मध्ये बदल करून ‘किंग्ज अँड क्राॅनिकल्स द मुगल काेर्ट्स (१६ वे व १७ वे शतक)’ यासंबंधीचा धडा काढून टाकला. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी मोगल साम्राज्याचा इतिहास अभ्यासणार नाहीत.
सीबीएसईच्या देशभरातील शाळांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके लागू हाेतात. त्यामुळे सीबीएससीच्या जवळपास सर्व शाळांमध्ये हा बदल पाहायला मिळेल. उत्तर प्रदेश मंडळानेदेखील एनसीईआरटीची अनेक पुस्तके लागू केली आहेत. तेथेही इतिहासाच्या पुस्तकात हा बदल दिसू शकताे.
एनसीईआरटीने हिंदीच्या पुस्तकांमध्येही काही कविता व परिच्छेद हटवण्याचे ठरवले आहे. इतर पुस्तकांतदेखील अनेक लहान-माेठे बदल केले आहेत. सिव्हिक्सच्या पुस्तकात बदल करताना ‘अमेरिकन हिजेमनी इन वर्ल्ड पाॅलिटिक्स’ व ‘द काेल्ड वाॅर इरा’ नावाचे धडेही हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीचे ‘इंडियन पाॅलिटिक्स आफ्टर इंडिपेंडेन्स’ या पुस्तकातील ‘राइज आॅफ पाॅप्युलर मूव्हमेंट्स’ व ‘इरा आॅफ वन पार्टी डाॅमिनन्स’ हे दाेन धडे वगळण्यात आले आहेत. १० वी ११ वीच्या पुस्तकांतूनही अनेक धडे हटवले गेले आहेत. अभ्यासक्रमातील हे बदल २०२३-२४ या चालू शैक्षणिक वर्षापासून लागू केले जाणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.