आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NCP Chief Sharad Pawar Said Instead Of Changing The Entire Agriculture Law, The Controversial Part Should Be Amended

नवीन कृषी कायद्यांना पवारांचे समर्थन:​​​​​​​राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले - ज्या भागांवर आक्षेप आहे तेथे बदल करायला हवे, मात्र कायदे पूर्णपणे रद्द केले जाऊ शकत नाहीत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी कायद्याबाबत विधानसभा अधिवेशनात चर्चा अशक्य

गेल्या सात महिन्यांपासून कृषी कायद्याबाबत सुरू असलेल्या निषेधांच्या दरम्यान केंद्र सरकारला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सहकार्य लाभले आहे. पवार म्हणाले की, कृषी कायदे पूर्णपणे नाकारता येत नाहीत. पण ज्या भागांमुळे शेतकऱ्यांना अडचणी आहेत, कायद्याच्या त्या भागामध्ये सुधारणा केली जाणे आवश्यक आहे.

मुंबईतील खासगी विद्यापीठाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले शरद पवार यांना महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ठराव आणणार का, असा सवाल माध्यमांना केला. त्यास उत्तर देताना ते म्हणाले की, 'संपूर्ण विधेयक नाकारण्याऐवजी ज्या भागाविषयी शेतकऱ्यांना आक्षेप आहे त्या भागामध्ये आपण बदल करू शकतो, ते म्हणाले की या कायद्याशी संबंधित सर्व पक्षांचा विचार केल्यावरच ते विधानसभेच्या पटलावर आणले जाईल.'

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुखांनी असेही म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा एक गट केंद्राच्या विधेयकाच्या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहे.

कृषी कायद्याबाबत विधानसभा अधिवेशनात चर्चा अशक्य
शरद पवार पुढे म्हणाले की, हा कायदा अंमलात आणण्यापूर्वी राज्यांनी त्याच्या वादग्रस्त बाबींचा विचार केला पाहिजे. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन दिवसीय अधिवेशनात हे विधेयक चर्चेला येऊ शकेल असे मला वाटत नाही. जर ते आले तर त्याचा विचार केला पाहिजे.

पवार पुढे म्हणाले की, गेल्या 7 महिन्यांपासून देशातील विविध भागात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी व केंद्र यांच्यात डेडलॉकची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्राने पुढाकार घेऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली पाहिजे.

केंद्र सरकारने पास केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मागील वर्षी 26 नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. गाझीपूर सीमा, सिंहू सीमा येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलनापासूनच शरद पवार हा कृषी कायदा बदलण्याच्या बाजूने राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...