आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NCP Sharad Pawar PM Modi Meeting । Sharad Pawar Press Conference । 20 Minutes Of Discussion Between Modi And Pawar In New Delhi

शरद पवार - पीएम मोदींची भेट:दोन्ही नेत्यांत 20 मिनिटे झाली चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण, शरद पवार स्वत: पत्रकार परिषद घेऊन करणार खुलासा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राजकारणात बुधवारी महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली. जवळपास 20 मिनिटे दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांत महाराष्ट्रातील मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीवर अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही. तथापि, शरद पवार स्वत: 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे ईडीचे शुक्लक्लाष्ठ

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमागे अंमलबजावणी संचलनालयाचे शुक्लक्लाष्ठ लागल्यापासून हे दोन्ही पक्ष यासाठी भाजपला जबाबदार धरत आहेत. केंद्रीय संस्थांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप अनेकदा शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही यावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केलेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची पंतप्रधान मोदींशी भेट झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

गल्लीत गोंधळ, दिल्लीत प्रीतिभोज

मुंबईत ठाकरे सरकारने एसआयटी नेमून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आघाडी उघडताच मंगळवारी संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. गल्लीत हा राजकीय गोंधळ सुरू असताना नवी दिल्लीत मंगळवारी रात्री आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयोजित केलेल्या प्रीतिभोजनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष हजेरी लावली होती.

शरद पवारांची चार वाजता पत्रकार परिषद

शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी झालेल्या मेजवानीप्रसंगी संजय राऊत तसेच महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती होती. विधिमंडळ नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पवारांनी ही मेजवानी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पवार-मोदींमध्ये नेमके काय बोलणे झाले याविषयी पवार स्वत: चार वाजता पत्रकार परिषदेत खुलासा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...