आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची मोठी घोषणा:राष्ट्रवादी काँग्रेस 3 राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार; उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश, लवकरच उत्तर प्रदेशचा करणार दौरा

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांविषयी मोठी घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी 3 राज्यात निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती पवारांनी दिली आहे.उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे. उत्तरप्रदेशात परिवर्तन होणार असून नागरिकांना बदल हवा आहे. याकरिता सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. येत्या दिवसात त्यांचे अनेक सहयोगी राष्ट्रवादीत येणार आहेत. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार

उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

भाजपचे गोव्यातून सरकार हटवण्याची गरज

मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. मणिपूर राज्यात काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. तसेच गोव्यातही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. भाजपचे गोव्यातून सरकार हटवण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असेही शरद पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...