आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावं!:शरद पवारांचे आवाहन, 2024ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे संकेत

हरियाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किमान समान कार्यक्रम आखून भाजपविरोधात लढण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे भाजपविरोधात 2024ची लोकसभा निवडणूक विरोधक एकत्र लढवणार, असे संकेत शरद पवारांनी दिल्याचे बोलले जात आहे.

हरियाणातील काही नेते, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा गुरुवारी दिल्लीत पार पडला. त्यानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना एकजुटीचे आवाहन केले.

हरियाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करणार असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.
हरियाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करणार असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षातील मतभेद समोर आले होते. मात्र, आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न नव्याने सुरू केल्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

युपीए अध्यक्षपद नको

शरद पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रम आखून विरोधी पक्ष एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करू शकतात. तसेच, वयोमानामुळे आता नवीन जबाबदारी घेण्याची आपली इच्छा नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून शरद पवार यांनी पंतप्रधानपद आणि यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. बुधवारी ठाणे येथे बोलतानाही पवारांनी 82 वर्षांच्या वयाचा संदर्भ देऊन देशातील सत्तेचे कोणतेही पद स्वीकारणार नाही आणि तशी इच्छाही नाही, असे सांगितले होते. काल त्याचा पुनरुच्चार पवारांनी केला.

नेतृत्वावरून मतभेद

2024 मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली आहे. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, यावर विरोधकांमध्ये अजून एकमत झालेले नाही. काँग्रेस कमकुवत झालेली असताना विरोधकांच्या नेतृत्वासाठी टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव अग्रक्रमावर आहे. पण, यावर विरोधकांमध्ये अद्याप सहमती झालेली नाही.

भाजपमुक्त भारताची घोषणा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी बुधवारी पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. 2024 च्या लाेकसभा निवडणुकीसाठी विराेधकांची माेट बांधण्याचा प्रयत्न करणारे राव यांनी नितीश व तेजस्वी यांच्यासाेबत बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी व त्यांच्या धाेरणांवर प्रश्न उपस्थित करून भाजपमुक्त भारत अशी घाेषणा दिली. राव यांनी राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

बातम्या आणखी आहेत...