आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NDA Entrance Exam For Girls Are Open Last Date For Filling The Application Is 8 October 2021

नवी दिल्ली:मुलींसाठी एनडीएमध्ये प्रवेश परीक्षेचे दरवाजे यंदाच खुले, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर 2021

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानंतर अखेर राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परीक्षेचे दरवाजे मुलींसाठीही खुले झाले आहेत. (यूपीएससीने शुक्रवारी एनडीए-२०२१ मध्ये मुलींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली. मुली २४ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इयत्ता १२ वीतील मुलीही अर्ज करू शकतात. अशा उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी १२ वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. महिलांसाठी शुल्क नाही.

पात्रता, निवडीच्या अटी
वयोमर्यादा :
जन्म २ जानेवारी २००३ च्या आधी आणि १ जानेवारी २००६ नंतर झालेला नसावा.
शैक्षणिक पात्रता : भूदल- मान्यताप्राप्त शाळा/शिक्षण मंडळातून १२ वी उत्तीर्ण. नौदल/हवाई दल - फिजिक्स आणि मॅथ्ससह १२ वीची परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असावी.
निवड प्रक्रिया : महिलांची निवड लेखी परीक्षा व सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या बुद्धिमत्ता -व्यक्तिमत्त्व चाचणीच्या माध्यमातून होईल. यात उत्तीर्ण उमेदवारांनाच एसएसबीच्या चाचणीत सहभागी होण्याची संधी.

बातम्या आणखी आहेत...