आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने बुधवारी रात्री नीट पीजीचा निकाल जाहीर केला आहे. सर्वसाधारण व ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा कट ऑफ २७५ गुण (५० पर्सेंटाइल) इतका राहिला. तो २०२१ मध्ये ३०२ गुणांचा होता. तथापि, गेल्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात कट ऑफ कमी करावा लागला होता. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा कटऑफ २४५ गुणांचा (४० पर्सेंटाइल) आणि खुल्या प्रवर्गाचा कटऑफ २६० गुणांचा (४५ पर्सेंटाइल) राहिला. उमेदवारांचा वैयक्तिक स्कोअर ८ जून किंवा त्यानंतर जारी होईल. नीट पीजीच्या आन्सर कीवर आलेले आक्षेप तपासल्यानंतर दोन प्रश्नांना बोनस गुण देण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया म्हणाले, नीट पीजीचा निकाल विक्रमी वेळेत जाहीर झाला आहे. ही परीक्षा २१ मे रोजी घेण्यात आली. परीक्षेला १.८२ लाख विद्यार्थी बसले होते.
बारावीचा निकाल पुढील आठवड्यात ः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे बुधवारी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.