आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घराची लक्ष्मणरेषा याकरिता गरजेची / देशात 56 दिवसांत 334 लोकांना संसर्ग झाला होता, आता 5 दिवसांत 325 रुग्ण

aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमध्ये कामासाठी आलेले राजस्थानमधील हजारो पोटार्थी कामगार घरी परतण्यासाठी कोणतेच साधन नसल्याने घोळक्याने पायीच गावाकडे परत निघाले आहेत.
  • देशात कोरोनाबाधितांसाठी रोज सज्ज केले जाताहेत 5000 बेड

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी देशभर लॉकडाऊन लागू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन केले. वाराणसीच्या लोकांसोबत व्हीसीच्या माध्यमातून बोलताना मोदी म्हणाले की, महाभारत युद्ध १८ दिवसांनी जिंकले होते, तर कोरोनाविरुद्ध जिंकण्यासाठी २१ दिवस आवश्यक आहेत. दरम्यान, देशात बधवारी ९१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६५९ झाली. भारतात कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढल्याने चिंता आहे. ३० जानेवारी ते २१ मार्चपर्यंत देशात ३३४ रुग्ण होते, ते पाच दिवसांत दुप्पट झाले. ४१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले, तर ११ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी मध्य प्रदेशात पहिला बळी नोंदवला गेला. उज्जैनच्या ६५ वर्षीय महिलेचा इंदूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. तिला संसर्ग कसा झाला हे कळू शकलेले नाही. तिने कुठेही प्रवास केलेला नव्हता. दरम्यान, बंगळुरूमध्ये ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती नुकतीच मक्काहून परतली होती. दरम्यान, कंेद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, २१ दिवसांदरम्यान देशात अत्यावश्यक सेवा व रेशन दुकाने सुरू राहतील. केंद्र सरकारने ८० कोटी गरिबांसाठी रेशन कार्डवर दोन किलो अधिक स्वस्त धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना ५ ऐवजी ७ किलो धान्य मिळेल. यात गहू ३ रुपये किलो आणि तांदूळ २ रुपये किलो दराने मिळतात.

फ्लिपकार्टची सेवा सुरू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली फ्लिपकार्टची सेवाही केवळ आवश्यक सामानासाठी आता सुरू करण्यात आली आहे. 

कमलनाथ यांच्या प्रेस काॅन्फ्ररन्सला गेलेला पत्रकार काेराेना पाॅझिटव्ह
भाेपाळचा एक पत्रकार काेराेना पाॅझिटिव्ह निघाला. तो २० मार्चला तत्कालीन सीएम कमलनाथ यांच्या प्रेस काॅन्फ्रन्सनंतर विधानसभेतही गेला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना १४ दिवस विलग करावे लागेल. या पत्रकाराची मुलगी नुकतीच लंडनहून आल्यावर काेराेना पाॅझिटिव्ह निघाली होती.

तयारी : देशात कोरोनाबाधितांसाठी रोज सज्ज केले जाताहेत ५००० बेड

देशभरातील रुग्णालयांत ४९ हजार बेड रिझर्व्ह केले
कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या साथीने रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढवत आहे. आतापर्यंत सरकारी दवाखान्यांत ४९ हजार खाटा सज्ज केल्या आहेत. दररोज  ५ हजार अतिरिक्त बेड सज्ज केले जाताहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, बुधवारपर्यंत केंद्र, राज्य, रेल्वे, ईएसआयसी, सेना आणि कोल इंडियाच्या रुग्णालयांत ४८,००० बेड रिझर्व्ह करण्यात आले होते.
- देशभरात आतापर्यंत ११,५०० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यातही रोज १००० बेड वाढवण्यात येत आहेत.
- आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर रुग्णाला मॉनिटर करण्यासाठी एक हजार सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- सर्वात मोठे आव्हान व्हेंटिलेटरचे आहे. सरकारकडे ८००० व्हेंटिलेटर आहेत. ७ कंपन्यांना व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

0