आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरज चोप्राने घडवला इतिहास:हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर जिंकले होते

लुसाने3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरज डायमंड लीग फायनलसाठी पात्र ठरला आहे. हा सामना झुरिचमध्ये 7-8 सप्टेबरला होईल.  - Divya Marathi
नीरज डायमंड लीग फायनलसाठी पात्र ठरला आहे. हा सामना झुरिचमध्ये 7-8 सप्टेबरला होईल. 

ओलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये विजयी कामगिरी करून आणखी एक विक्रम रचला. चोप्राने आपल्या पहिल्या थ्रोमध्ये 89.08 मीटर दूर भाला फेकला. यामुळे ते डायमंड लीग मीटिंग पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरलेत. नीरज डायमंड लीगच्या अंतिम सामन्यासाठीही पात्र ठला आहे. हा सामना 7 व 8 सप्टेबर रोजी स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये होईल.

पहा व्हिडिओ

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्समध्ये अंतिम सामन्यात झाला होता जखमी

नीरज चोप्रा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या फायनलमध्ये जखमी झाला होता. त्यावेळी तो मांडीवर पट्टी बांधलेल्या स्थितीत दिसून आला होता. तेव्हा त्याने 88.13 मीटर दूर भाला फेकून रौप्य पदक जिंकले होते.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेनंतर नीरज चोप्राचे MRI स्कॅन करण्यात आले. त्यात कंबरदुखीचा त्रास दिसून आला. परिणामी, त्याला महिनाभराची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. यामुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतर राष्ट्रकुल उद्घाटन सोहळ्यात तिरंगा हाती धरता आला नसल्याची खंत त्याने एका पोस्टद्वारे व्यक्त केली होती.

स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नवा विक्रम

नीरज चोप्राने स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. हा त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रमही आहे.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर दूर भाला फेकला. यामुळे तो डायमंड लीग फायनलसाठी पात्र ठरला.
नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर दूर भाला फेकला. यामुळे तो डायमंड लीग फायनलसाठी पात्र ठरला.

नीरजकडे सर्व प्रमुख पदके

नीरज चोप्राने आतापर्यंत देशाला अनेक पदके मिळवून दिली. हरियाणाच्या या खेळाडूकडे ऑलिम्पिकपासून जागतिक विश्वविजेतेपदापर्यंतचे सर्वच प्रमुख स्पर्धांचे पदके आहेत.

बातम्या आणखी आहेत...