आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEET परीक्षेत अपयशाच्या भीतीपोटी आत्महत्या:तामिळनाडूच्या राजलक्ष्मीने आत्महत्येपुर्वी वडिलांना बाजारात पाठवले, परीक्षेचा हा तिसरा प्रयत्न होता

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात गुरुवारी राजलक्ष्मी नावाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. NEET परीक्षेच्या निकालात नापास होण्याची भीती असल्याने तिने हे पाऊल उचलले. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.

NEET चा निकाल 7 सप्टेंबरला लागणार आहे. राजलक्ष्मीचा हा तिसरा प्रयत्न होता. यावेळीही आपण नापास होऊ नये, असे तिला वाटत होतीे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजलक्ष्मीच्या वडिलांनी सांगितले की, राजलक्ष्मीने त्यांना बाजारात जाऊन नाश्ता आणण्यास सांगितले आणि ते निघून गेले. घरी येताच त्यांना मुलगी फासावर लटकलेली दिसली. राजलक्ष्मीही अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती, असेही त्यांनी सांगितले.

16 जुलैलाही आत्महत्या
तमिळनाडूच्या अरियालूरमध्ये 16 जुलै रोजी NEET परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यींनीने आत्महत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीकडे एक चिठ्ठी सापडली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते की, NEET ची परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे आणि मला नापास होण्याची भीती आहे. या भीतीपोटी हे पाऊल उचलत आहे.

तथापि, तिने 2020-21 मध्ये परीक्षा देखील दिली होती. ज्यामध्ये 529 गुण मिळाल्याने निवड झाली नाही. यानंतर तीने यंदाही परीक्षेची तयारी केली होती. मात्र यंदाही आपली निवड होणार नाही, असे तिला वाटत होते. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीवर अभ्यासाबाबत आमच्याकडून दबाव नव्हता. ती स्वतःच्या इच्छेने NEET ची तयारी करत होती.

5 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
जुलै महिन्यात राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पाच घटना घडल्या. कल्लाकुरीची, तिरुवल्लूर, कुड्डालोर, शिवगंगा येथे 12 वीच्या चार विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. तर शिवकाशी जिल्ह्यात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...